MHSRB Recruitment 2022 : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहेत याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. 


मेडिकल क्षेत्रात अर्थात वैद्यकीय विभागात सरकारी नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी चांगली बातमी आहे. एमबीबीएस (MBBS) पदवी शिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी आहे. वैद्यकीय आरोग्य सेवा भरती मंडळाने (MHSRB) भरती जारी केली आहे. या भरतीअंतर्गत सिव्हिल असिस्टंट सर्जन आणि इतर पदांवर भरती करण्यात येणार आहे. MBBS पदवी शिक्षण घेतलेले इच्छुक उमेदवार या भरतीअंतर्गत अर्ज करु शकतात. या भरतीअंतर्गत एकूण 1326 रिक्त पदांवर भरती करण्यात येणार आहे. यासाठी इच्छुक उमेदवार mhsrb.telangana.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज दाखल करु शकतात. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 15 जुलैपासून सुरु झाली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑगस्ट आहे. अवघे काही दिवस शिल्लक आहेत. लवकरात लवकर अर्ज दाखल करा.


महत्वाच्या तारखा


ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाल्याची तारीख - 15 जुलै 2022
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 14 ऑगस्ट 2022


रिक्त पदांचा तपशील जाणून घ्या


सिव्हिल असिस्टंट सर्जन : 751 पदं
शिक्षक : 357 पदं
सिव्हिल असिस्टंट सर्जन (जनरल) : 211 पदं
सिव्हिल असिस्टंट सर्जन : 7 पदं


शैक्षणिक पात्रता


या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे एमबीबीएस (MBBS) पदवी असणं आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रतेशी संबंधित अधिक माहितीसाठी, उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अधिसूचना पाहणे सोयीस्कर ठरेल.


वयोमर्यादा


या भरतीअंतर्गत अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवारांचं किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 44 वर्ष असावं.


किती पगार असेल?


सिव्हिल असिस्टंट सर्जन : 58,850 रुपये ते 1,37,050 रुपये
शिक्षक : 57,700 रुपये ते 1,82,400 रुपये
जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसर : 58,850 रुपये ते 1,37,050 रुपये
सिव्हिल असिस्टंट सर्जन : 58,850 रुपये ते 1,37,050 रुपये


महत्त्वाच्या इतर बातम्या