MDL Recruitment 2022 : Mazagon Dock Shipbuilders Limited (MDL) ने अप्रेंटिस पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी काहीच दिवस शिल्लक आहेत. तुम्हीही येथे नोकरी करण्यासाठी इच्छुक असाल तर अजिबात वेळ घालवू नका, लगेच अर्ज करा. ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचे आहेत त्यांनी mazagondock.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन 21 जुलैपूर्वी अर्ज करावेत. या भरती प्रक्रियेअंतर्गत, शिकाऊ उमेदवारांच्या एकूण 45 रिक्त पदांची भरती केली जाईल. या पदांवरील भरती गट 'अ', 'ब' आणि गट 'क' अंतर्गत करण्यात येणार आहे. 


भरती प्रक्रियेतील महत्त्वाच्या तारखा 



  • अर्ज करण्याची तारीख : 7 जुलै 2022

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 जुलै 2022

  • परीक्षेची संभाव्य तारीख : 30 जुलै 2022


भरतीअंतर्गत येणाऱ्या पदांचे तपशील : 



  • इलेक्ट्रिशियन : 40 पदं

  • फिटर : 42 पदं

  • पाईप फिटर : 60 पदं

  • स्ट्रक्चरल फिटर : 42 पदं

  • फिटर स्ट्रक्चरल : 50 पदं

  • आयसीटीएसएम : 20 पदं

  • इलेक्ट्रॉनिक मैकेनिक : 20 पदं

  • पाईप फिटर : 20 पदं

  • वेल्डर : 20 पदं

  • कंप्यूटर ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट : 20 पदं

  • सुतार : 20 पदं

  • रिगर : 2 पदं

  • वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिक) – 2 पदं


शैक्षणिक पात्रता 


या पदांसाठी, उमेदवारानं संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय पदवी असणं आवश्यक आहे. अधिक शैक्षणिक पात्रतेच्या माहितीसाठी, उमेदवारांनी जारी केलेली अधिसूचना तपासावी. 


वयोमर्यादा 


शिकाऊ पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय गट 'अ' पदांसाठी कमाल 19 वर्षे, गट 'ब' पदांसाठी कमाल 21 वर्षे आणि गट 'क' पदांसाठी कमाल 18 वर्षे निश्चित करण्यात आलं आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी उच्च वयोमर्यादेतही सवलत आहे.


निवड प्रक्रिया


इच्छुक उमेदवांराची निवड लेखी परीक्षेद्वारे केली जाईल. परीक्षा CBT मोडमध्ये असेल. 


अनेक तरुण सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात. अनेकदा वेळीच माहिती न मिळाल्यामुळे नोकरीची संधी हातातून जाते. त्यामुळेच नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण-तरुणींसाठी एबीपी माझा खाजगी आणि सरकारी क्षेत्रातील नोकरीसंबंधातील माहिती जॉब माझा या विशेष कॅटेगरीमध्ये दररोज प्रकाशिक करतं. वेगवेगळ्या कंपन्या, संस्थांतील नोकर भरतीबाबत जाणून घेण्यासाठी एबीपी माझाच्या वेबसाईटला नक्की भेट द्या.  


महत्त्वाच्या इतर बातम्या :