Mahavitaran Bharti 2024 : नोकरीच्या शोधात (Job Alert) असलेल्या उमेदवारांसाठी कामाची बातमी आहे. महावितरणमध्ये (Mahavitaran) बंपर भरती सुरु आहे. महत्त्वाचं म्हणजे या भरतीसाठी अर्ज करण्याची मुदत आता वाढवण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य वितरण कंपनीमध्ये (MSEDCL) 468 जागांसाठी भरती सुरु असून या भरतीसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख वाढवून आता 19 एप्रिल करण्यात आली आहे. त्यामुळे सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन लगेचच अर्ज दाखल करा.


MahaVitaran Recruitment 2024 : महावितरणमध्ये 468 रिक्त पदांवर भरती


महाराष्ट्र राज्य वितरणमध्ये (Maharashtra State Electricity Distribution Company Limited) 468 रिक्त जागांवर भरती करण्यात येत आहे. महावितरणमध्ये कनिष्ठ सहाय्यक अकाऊंट्स (Junior Assistant Accounts) पदांवर भरती सुरु आहे.


MahaVitaran Recruitment 2024 : सरकारी नोकरीची सुवर्णसंधी


पद : कनिष्ठ सहाय्यक लेखा (Junior Assistant Accounts)


MahaVitaran Recruitment 2024 : रिक्त पदांची संख्या : 468 पदे


MahaVitaran Recruitment 2024 : भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख


भरतीसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत : 19 एप्रिल 2024


महाराष्ट्रा राज्य वितरण भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 एप्रिल 2024 आहे. याआधी भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2024 होती. मात्र, ही मुदत आता वाढवण्यात आली असूव इच्छूक आणि पात्र उमेदवार 19 एप्रिल 2024 पर्यंत अधिकृत संकेतस्थळावर अर्ज दाखल करु शकता.


MahaVitaran Recruitment 2024 : शैक्षणिक पात्रता


महावितरणमध्ये कनिष्ठ सहाय्यक लेखा पदांसाठी इच्छुक उमेदवाराची शैक्षणिक पात्रता B.Com किंवा BMS किंवा BBA किंवा संबंधित पदवी असणे आवश्यत आहे. याशिवाय MSCIT कोर्स पूर्ण असणे गरजेचे आहे.


MahaVitaran Recruitment 2024 : वयोमर्यादा


महाराष्ट्र राज्य वितरणमध्ये कनिष्ठ सहाय्यक लेखा पदासाठी पात्र उमेदवाराचे वय 30 वर्षे आहे. उमेदवाराचे वय 29 डिसेंबर 2023 पर्यंत 30 वर्षांपेक्षा जास्त नसावे. मागासवर्गीय गटातील उमेदवाराला वयोमर्यादेमध्ये 5 वर्षांची सवलत देण्यात येईल.


MahaVitaran Recruitment 2024 : अर्जाचे शुल्क


या भरतीसाठी इच्छुक उमेदवाराला अर्ज दाखल करण्यासाठी 500 रुपये अर्ज शु्ल्क भरावे लागेल. मागासवर्गीय उमेदवाराला अर्ज शुल्कात सूट देण्यात आल्याने त्यांना फक्त 250 रुपये शुल्क भरावे लागेल.


अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या (Job Vacancy) शोधात असतात. पण अनेक वेळा शिक्षण (Education)आणि पात्रता (Eligibility) असून देखील माहितीच्या अभावी ही संधी निघून जाते. ही बाब लक्षात घेत 'एबीपी माझा'नं (ABP Majha) पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध असून त्यासाठीची पात्रता काय आहे आणि अर्ज कुठे आणि कसा करायचा याची सविस्तर माहिती येथे वाचा.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


मोठी बातमी! ठाकरे-पवारांचे शिलेदार कोण? शिवसेना-राष्ट्रवादीच्या उमेदवारांची उद्या घोषणा