Maharashtra State Power Generation Company Limited 2022 :  दरमहा दोन लाख रुपये कमवायचे आहेत, 50 वर्षे वय असलेलेही अर्ज करू शकतात. महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेडने मुख्य अभियंता, उपमुख्य अभियंता आणि अधीक्षक अभियंता पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 मे 2022 आहे. महत्त्वाच्या तारखा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, पगार आणि अर्ज कसा करायचा जाणून घ्या सविस्तर माहिती...


महत्वाची तारीख
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 17 मे 2022


रिक्त जागा तपशील
मुख्य अभियंता- 07 पदे
उपमुख्य अभियंता - 11 पदे
अधीक्षक अभियंता- 23 पदे


शैक्षणिक पात्रता
मुख्य अभियंता – इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इंस्ट्रुमेंटल/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार अभियांत्रिकी/पॉवर इंजिनीअरिंग/इलेक्ट्रिकल आणि पॉवर इंजिनिअरिंग आणि तंत्रज्ञान या विषयात बी.टेक. वीज निर्मिती कंपनीत 15 वर्षांचा कामाचा अनुभव.


उपमुख्य अभियंता - इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इंस्ट्रुमेंटल/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार अभियांत्रिकी/पॉवर इंजिनीअरिंग/इलेक्ट्रिकल आणि पॉवर इंजिनीअरिंग आणि तंत्रज्ञान या विषयात बी.टेक. 12 वर्षांचा अनुभव असावा.


अधीक्षक अभियंता - इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इंस्ट्रुमेंटल/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार अभियांत्रिकी/पॉवर इंजिनीअरिंग/इलेक्ट्रिकल आणि पॉवर इंजिनीअरिंग आणि तंत्रज्ञान या विषयात बी.टेक. 12 वर्षांचा अनुभव असावा.


वय श्रेणी
मुख्य अभियंता पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे कमाल वय 50 वर्षे असावे. उपमुख्य अभियंता पदासाठी उमेदवारांचे कमाल वय ४८ वर्षे असावे. तर अधीक्षक अभियंता पदांसाठी उमेदवारांचे कमाल वय 45 वर्षे असावे.


या पदांसाठी अर्ज करण्यासाठी, तुम्ही अधिकृत वेबसाइट mahagenco.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकता.


महत्त्वाच्या बातम्या :