SSC MTS 2021 Tier 2 Exam : कर्मचारी निवड आयोग (SSC) मल्टी-टास्किंग स्टाफ (नॉन-टेक्निकल) च्या पदांवर भरतीसाठी परीक्षा-2020 चा पेपर 2 (वर्णनात्मक) 08 मे 2022 रोजी आयोजित करण्यात येणार आहे. ही परीक्षा वेगवेगळ्या केंद्रांवर होणार आहे. जिथे कोरोनाच्या पार्श्वभूमवर सर्व मार्गदर्शक तत्त्वांचं पालन करण्यात येईल.

जारी केलेल्या नोटीसप्रमाणे, कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे परीक्षेची तारीख बदलली जाऊ शकते. याची माहिती योग्य वेळेत दिली जाईल, असे सांगण्यात आलं आहे. SSC MTS 2020 पेपर-1 चा निकाल मार्चमध्ये जाहीर झाला. टियर-1 परीक्षा 5 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर दरम्यान देशभरातील विविध केंद्रांवर ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली. 44 हजार 600 पेक्षा जास्त उमेदवार टियर-1 परीक्षेत पात्र ठरले होते. हे उमेदवार टियर 2 परीक्षेसाठी पात्र आहेत.

शैक्षणिक पात्रतापरीक्षेला बसलेल्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्डातून मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. इच्छुक विद्यार्थी आयोगाच्या वेबसाइटवर आपले अर्ज ssc.nic.in या संकेतस्थळावर भरु शकतात.

वयोमर्यादाया पदांसाठी वयोमर्यादा 18 ते 25 वर्षे दरम्यान असावी. एससी/एसटी (SC/ST), अपंग व्यक्ती आणि माजी सैनिक यांना वयोमर्यादेत सवलत दिली जाईल. 

अर्जाची फी परीक्षेला बसण्यासाठी उमेदवाराला 100 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. ऑनलाइन फी भरण्याची शेवटची तारीख 02 मे आहे. महिला उमेदवार अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), अपंग व्यक्ती (PWD) आणि माजी सैनिक (ESM) उमेदवारांना फीमधून सूट देण्यात आली आहे. इतर कोणत्याही प्रकारच्या माहितीसाठी उमेदवार कर्मचारी निवड आयोगाच्या अधिकृत साइटची मदत घेऊ शकतात.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI