PMC Bank Vacancy 2022 : नोकरीच्या शोधात असाल आणि बँकेत नोकरी करण्याची इच्छा असेल, तर पंजाब नॅशनल बँकेत अर्ज करु शकता. पंजाब नॅशनल बँकेत नोकरी मिळवण्याची ही सुवर्णसंधी आहे. पंजाब नॅशनल बँकेनं pnbindia.in वर 20 एप्रिल 2022 रोजी SO च्या भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत विशेषज्ञ अधिकारी पदांसाठी भरती करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार बँकेच्या अधिकृत वेबसाइट pnbindia.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज सबमिट करू शकतात. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 7 मे 2022 आहे. पदांच्या भरतीसाठी 12 जून 2022 रोजी परीक्षा घेतली जाईल.


रिक्त जागांचा तपशील


या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 145 पदांची भरती करण्यात आली आहे. ज्यामध्ये व्यवस्थापकाची 40 पदं, व्यवस्थापक (क्रेडिट) 100 पदं आणि वरिष्ठ व्यवस्थापकाची 5 पदं आहेत.


शैक्षणिक पात्रता


PNB मधील व्यवस्थापक पदांसाठी फायनान्समध्ये MBA किंवा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन फायनान्स असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. भरती अधिसूचनेत तपशीलवार शैक्षणिक पात्रता तपासा.


अनुभव 


व्यवस्थापक पदांसाठी 1 वर्षाचा अनुभव आणि वरिष्ठ व्यवस्थापक पदांसाठी किमान 3 वर्षांचा अनुभव असलेले उमेदवार अर्ज करू शकतात.


निवड प्रक्रिया 


पीएनबी एसओ 2022 साठी उमेदवारांची निवड ऑनलाईन परीक्षा, मुलाखतीच्या आधारे होणार आहे. यासाठी ऑनलाइन परीक्षा 12 जून 2022 रोजी आयोजित करण्यात येणार आहे. 


वेतन 


व्यवस्थापक (क्रेडिट, जोखीम) या पदांसाठी निवडलेल्या उमेदवारांना 48,170 रुपये ते 69,810 रुपये वेतन मिळेल आणि वरिष्ठ व्यवस्थापकाच्या पदांसाठी, उमेदवारांना दरमहा रुपये 63,840 ते 78,230 रुपये वेतन मिळेल.


वयोमर्यादा 


मॅनेजर पदांसाठी 25 ते 35 वर्ष आणि सिनियर मॅनेजर पदांसाठी 25 ते 27 वय असणारे उमेदवार अर्ज करु शकतात. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :