Maharashtra Police Bharti 2024  : पोलीस दलात नोकरीच्या अनुषंगाने तयारी करणार्‍यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्यातील ठाणे (Thane) आणि रायगड (Raigad) जिल्ह्यात विविध पदासाठी घेण्यात येणाऱ्या पोलीस भरतीची (Maharashtra Police Bharti 2024) माहिती समोर आली आहे. रायगड जिल्ह्यात 422 पोलीस पदांसाठी 31 हजार 63 अर्ज दाखल झाले आहेत. तर ही भरती 21 जूनपासून नेहूली येथील क्रिडा संकुलात पार पडणार आहे. तब्बल 30 दिवस ही भरती प्रक्रिया सुरु राहणार आहे. अत्यंत पारदर्शक पध्दतीने ही भरती (Police Bharti) होणार असून कुठल्याही गैर प्रकार होणार नाही, याची खबरदारी घेण्यात आल्याची माहिती पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी आज पत्रकार परीषदेत दिली.


पोलीस शिपाईपदासाठी (बॅन्ड्समन समाविष्ठ 9 पद) 391 आणि  चालक पोलीस शिपाई 31 पदांसाठी ही भरती होणार आहे. पोलीस शिपाई पदाकरीता 23 हजार 793 पुरुष, तर 4 हजार 860 महिला असे एकुण 28 हजार 833 अर्ज प्राप्त झालेले आहेत. तर चालक शिपाई पदाच्या 31 रीक्त जागांसाठी 2 हजार 230 अर्ज प्राप्त झाले असल्याचे जिल्हा पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे,  अप्पर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे यांनी यावेळी सांगितले.


ठाणे शहर 666 रिक्त पदासाठी मैदानी चाचणी प्रक्रिया 19 जून पासून 


ठाणे पोलीस भरतीच्या 666 पोलीस शिपाई रिक्त पदासाठीची प्रक्रिया येत्या 19 जून पासून साकेत मैदान येथे सुरु होणार आहे. अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय जाधव यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. या मध्ये पोलीस शिपाई पदासाठी 38,078 अर्ज प्राप्त झाले असून, पोलीस शिपाई भरतीसाठी 30,155,महिला पोलीस शिपाई साठी 7923 अर्ज, चालक पोलीस शिपाई पुरुष 1408,चालक पोलीस शिपाई महिला 119 अर्ज प्राप्त झाले आहेत. 


या भरतीसाठी येणाऱ्या उमेदवारासाठी साकेत मैदान येथे पावसाळी मंडप टाकण्यात आले आहे. वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच मैदानी चाचणी करिता साकेत पोलीस मैदान येथे 200 मिटरचे दोन, तसेच गोळफेक करीता 7 मैदान तयार करण्यात आले आहे. या पोलीस भरती बंदोबस्ताकरिता 100 पोलीस अधिकारी आणि  500 पोलीस अंमलदार तसेच 70 मंत्रालयीन कर्मचारी नेमण्यात आल्याची माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय जाधव यांनी आज दिली आहे.


इतर महत्वाच्या बातम्या