Jobs Opportunities : जर तुम्ही नोकरीच्या (Govt Job) शोधात असाल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी समोर आली आहे. कॅबिनेट सचिवालयात स्टॉक व्हेरिफायरची (Stock Verifier) पदे भरली जाणार आहेत. या पदासाठी चांगला पगार मिळणार आहे. दरम्यान, यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. या पदांसाठी शैक्षणिक अर्हता काय? वयोमर्यादा काय? याबाबतची सविस्तर माहिती पाहुयात.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, कॅबिनेट सचिवालयात नोकरीची मोठी संधी निर्माण झाली आहे. कॅबिनेट सचिवालयात स्टॉक व्हेरिफायरची पदे भरली जाणार आहेत. यासाठी ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागवण्यात आले आहेत. या नोकरीसाठी अर्ज करण्यास तुमच्याकडे कमी कालावधी राहिला आहे. त्यामुळं तुम्ही लवकरात लवकर या पदांसाठी अर्ज करणं गरजेचं आहे.
किती मिळणार पगार?
ऑफिस ऑफ डायरेक्टर अकाऊंट, कॅबिनेट सेक्रेटरीएंट या संस्थे अंतर्गत स्टॉक व्हेरिफायर ही पदे भरली जातील. निवड झालेल्या उमेदवाराला 7 व्या सीपीसीनुसार मॅट्रीक्स लेव्हल 4 नुसार पगार मिळणार आहे. उमेदवारांना दरमहा 25 हजार 500 ते 81 हजार 100 रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे. तसेच उमेदवारांना मूळ पगारावर 20 टक्के सुरक्षा भत्ता दिला जाणार आहे. त्यांमुळं या पदांवर नियुक्ती होणाऱ्या उमेदवारांना चांगला पगार मिळणार आहे. त्यामुळं नोकरीची ही मोठी संधी आहे. इच्छुक तरुणांनी या संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे.
नोकरीसाठी पात्रता काय?
कॅबिनेट सचिवालयातील स्टॉक व्हेरिफायर या पदासाठी, भारतीय वायुसेना सार्जंट/सीपीएल किंवा त्याच्या समकक्षांना ऑर्डनन्स/एअरक्राफ्टचे खाते स्टोअर्स हाताळण्याचा किमान तीन वर्षांचा अनुभव असावा. उमेदवार भरतीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन पात्रतेशी संबंधित इतर सर्व तपशील तपासू शकतात.
अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार स्टॉक व्हेरिफायर या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 3 डिसेंबर आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जात काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर अर्ज आल्यास अर्ज बाद करण्यात येईल.
अर्ज करण्याची नेमकी प्रक्रिया काय?
सर्वप्रथम कॅबिनेट सचिवालयाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्जाचा नमुना डाऊनलोड करा. यानंतर अर्जात मागितलेला तपशील भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा. अर्ज भरण्यापूर्वी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा. भरलेला अर्ज आपल्या जिल्हा सैनिक बोर्ड किंवा राज्य सैनिक बोर्डच्या माध्यमातून जमा करा. ऑफलाइनसोबतच अधिकृत ईमेल आयडी dgrddemp@desw.gov.in वर अर्ज पाठवावा लागेल.