मुंबई : महायुती सरकारचा शपथविधी आता तोंडावर आला असतानाच शिवसेना शिंदे गटाच्या वतीने चर्चेसाठी पुढाकार घेण्यात आल्याचं दिसून येतंय. शिंदेंचे शिलेदार उदय सामंत यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत मंत्रिपदांवर चर्चा केल्याची माहिती आहे. तसेच शिवसेनेचे संभाव्य मंत्र्यांची यादीही समोर आली आहे. त्यामध्ये स्वतः एकनाथ शिंदे यांच्यासह संजय राठोड आणि इतर पाच नेत्यांची नावं असल्याची माहिती आहे.
मुख्यमंत्रिपद भाजपला गेल्यानंतर एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या. त्यानंतर शिवसेनेला गृहमंत्रिपद मिळावं अशी मागणी करण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यानच्या काळात एकनाथ शिंदे आजारी असल्याने महायुतीची बैठक होऊ शकली नव्हती. त्यामुळे कुणाला किती मंत्रिपदं याची निश्चिती होत नव्हती. पण आता शिंदेंच्या शिवसेनेकडून हालचाली सुरू असून उदय सामंतांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे.
Shiv Sena Ministers List : शिवसेना संभाव्य मंत्र्यांची नावे
1. एकनाथ शिंदे
2. दादा भुसे
3. शंभूराज देसाई
4. गुलाबराव पाटील
5. अर्जुन खोतकर
6. संजय राठोड
7. उदय सामंत
उदय सामंत यांनी सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. त्यामध्ये गुरूवारी होणाऱ्या शपथविधीच्या तयारीवर चर्चा झाल्याची माहिती आहे. या बैठकीत उदय सामंत यांनी शिवसेनेचा प्रस्ताव देवेंद्र फडणवीसांच्या समोर ठेवल्याची माहिती आहे. 23 नोव्हेंबर नंतर शिवसेना नेते आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये झालेली ही पहिलीच बैठक आहे.
महायुतीत भाजपच्या संभाव्य मंत्र्यांची यादी समोर
भाजपकडून 16 जणांना मंत्रिपदाची शपथ मिळू शकते. रवींद्र चव्हाण, मंगलप्रभात लोढा, विखे पाटील, गिरीश महाजनांचं मंत्रिपद कायम राहणार असल्याची माहिती आहे. तर नितेश राणे, गणेश नाईक यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.
शिंदेंवर उपचार झाले
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रकृती बिघडल्याने उपचारासाठी ते ज्युपिटर रूग्णालयात गेले होते. घसा दुखत असल्याने उपचार करून घेण्यासाठी शिंदे रुग्णालयात गेले होते. तिथे काही वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. शिंदे यांच्या पांढऱ्या पेशीही वाढल्या असल्याची माहिती आहे. त्यामुळे त्यांच्यावर उपचार करावे लागणार आहेत.
सतत अँटिबायोटिक दिल्याने शिंदेंना अशक्तपणा जाणवत आहे.तसंच मुख्यमंत्र्यांच्या मिसेस या सुद्धा ज्युपिटर रुग्णालयात सोबत होत्या. तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार करण्यात आला आणि नंतर काही वेळातच त्यांना घरी सोडलं गेलं.
ही बातमी वाचा: