Job Opportunity : सध्या बाजारात इलेक्ट्रिक वाहनांना (EV) महत्वाचे स्थान प्राप्त होत आहे. याच इलेक्ट्रिक वाहनांना महत्वाचे स्थान प्राप्त होत असल्यामुळे बायजू'ज समूहाचा भाग असलेल्या तसेच उच्चशिक्षण आणि व्यावसायिक प्रशिक्षण यांच्या साठीच्या आघाडीच्या जागतिक एडटेक कंपन्यांपैकी एक असलेल्या ग्रेट लर्निंगने (Great Learning) आज, पीजी प्रोग्राम इन इलेक्ट्रिक वाहन डिझाइन (PG program in Electric Vehicle Design) या नवीन पदव्युत्तर अभ्यासक्रमाची घोषणा केली. ग्रेट लेक्स एग्झिक्युटिव लर्निंगच्या सहयोगाने हा अभ्यासक्रम घेतला जाणार आहे. साधारण 8 महिन्यांचा हा अभ्यासक्रम असणार आहे. नुकतीच इंजिनीअरिंगची पदवी घेतलेल्यांना किंवा नुकतेच करिअर सुरू केलेल्यांना या माध्यमातून नक्कीच फायदा होणार आहे.   


या संदर्भात ग्रेट लर्निंगचे सहसंस्थापक हरीकृष्णन नायर (Hari Krishnan Nair) या अभ्यासक्रमाबद्दल म्हणाले, “ईव्ही हे वाहतुकीचे भवितव्य आहे. अतिकुशल इंजिनीअरिंग व्यावसायिकांनी ईव्ही डिझाइन तंत्रज्ञानावर काम करावे अशी मागणी वाढत आहे. या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उद्योगक्षेत्रातील विविध तज्ज्ञांकडून शिकण्याची संधी तर मिळेलच, शिवाय या नवीन रोमांचक क्षेत्रात करिअर घडवणाऱ्या आणि पुढे नेणाऱ्या संधीही त्यांना मिळतील.”


या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून इलेक्ट्रिक वाहनांच्या डिझायनिंगचे कौशल्य संपादन करण्याची क्षमता विद्यार्थ्यांना मिळणार आहे. तसेच या माध्यमातून विद्यार्थ्यांना ईव्ही उद्योगातील त्यांचे करिअर जोरात सुरू करण्याची संधी मिळणार आहे. 


नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालांनुसार, भारतातील ईव्ही उद्योग 2027 पर्यंत 10 पटींनी वाढून 15 अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत पोहोचणे अपेक्षित आहे. तसेच या माध्यमातून 7.5 लाखांहून अधिक नवीन रोजगार निर्माण होणार आहेत. ग्रेट लर्निंगने सुरु केलेल्या या उपक्रमामुळे  डिझाइन इंजिनीअर, एमबीडी इंजिनीअर, टेस्टिंग इंजिनीअर आणि पॉवर इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअर अशा मोठ्या पदांवर नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. 


हा अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण करणारे आघाडीच्या वाहन कंपन्या आणि सेवा पुरवठादार कंपन्यांमध्ये नोकरीसाठी पात्र होणार आहेत. अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना ग्रेट लेक्स एग्झिक्युटिव लर्निंगकडून प्रमाणपत्रही प्रदान केले जाणार आहे.


महत्वाच्या बातम्या :