HAL Bharti 2022 : हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (Hindustan Aeronautics Limited) द्वारे अनेक पदांसाठी भरती करण्यात आली आहे. ज्यासाठी उमेदवार अधिकृत साइट hal.india.co.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 ऑगस्ट 2022 निश्चित करण्यात आली आहे. या भरती मोहिमेद्वारे 178 पदे भरण्यात येणार आहेत. 


रिक्त जागांचा तपशील 


ग्रॅज्युएट्स अप्रेंटिस



  • यांत्रिक अभियंता : 43 पदं

  • विद्युत अभियंता : 13 पदं

  • इंजिनिअर (ई अॅन्ड टीसी) : 15 पदं

  • कम्प्युटर इंजिनिअर : 7 पदं

  • नर्सिंग सहायक : 5 पदं

  • वैमानिकी अभियंता : 5 पदं

  • सिविल इंजिनिअर : 4 पदं

  • प्रोडक्शन इंजिनिअर : 4 पदं

  • फार्मासिस्ट : 3 पदं


डिप्लोमा अप्रेंटिस



  • वैमानिकी अभियंता : 3 पदं

  • सिविल इंजिनिअर : 4 पदं

  • कम्प्युटर इंजिनिअर : 6 पदं

  • विद्युत अभियंता : 15 पदं

  • इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार

  • इंजिनियर (ई अँड टीसी) : 12 पदं

  • यांत्रिक अभियंता : 33 पदं

  • लॅब असिस्टेंट : 3 पदं

  • हॉटेल प्रबंधन : 3 पदं


शैक्षणिक पात्रता


हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या या भरती मोहिमेअंतर्गत नर्सिंग असिस्टंटच्या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे B.Sc नर्सिंगची पदवी असणं आवश्यक आहे. तर ग्रॅज्युएट अप्रेंटिससाठी संबंधित विषयात पदवी आणि डिप्लोमा अॅप्रेंटिससाठी संबंधित विषयात डिप्लोमा असणं आवश्यक आहे.


अशी होणार निवड


या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी कागदपत्र पडताळणीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. 


भरती प्रक्रियेतील महत्त्वाच्या तारखा 


अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख : 22 जुलै 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 ऑगस्ट 2022
दस्तऐवज पडताळणीची तारीख : 16-31 ऑगस्ट 2022 (तात्पुरती)


अनेक तरुण सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात. अनेकदा वेळीच माहिती न मिळाल्यामुळे नोकरीची संधी हातातून जाते. त्यामुळेच नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण-तरुणींसाठी एबीपी माझा खाजगी आणि सरकारी क्षेत्रातील नोकरीसंबंधातील माहिती जॉब माझा या विशेष कॅटेगरीमध्ये दररोज प्रकाशिक करतं. वेगवेगळ्या कंपन्या, संस्थांतील नोकर भरतीबाबत जाणून घेण्यासाठी एबीपी माझाच्या वेबसाईटला नक्की भेट द्या.


महत्त्वाच्या इतर बातम्या :