Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहेत याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. 


हिंदुस्थान एरोनॉटिक्स लि., नाशिक


पोस्ट - ITI ट्रेड अप्रेंटिस



  • शैक्षणिक पात्रता - संबंधित ट्रेडमध्ये ITI

  • एकूण जागा - 455 (यात फिटरसाठी 186 जागा, टर्नरसाठी 28 जागा, मशिनिस्टसाठी 26 जागा, कारपेंटरसाठी 4 जागा, मशिनिस्ट (ग्राईंडर)साठी 10 जागा, इलेक्ट्रिशियनसाठी 66 जागा, ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल)साठी 06 जागा, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिकसाठी 08 जागा, पेंटरसाठी 07 जागा, शीट मेटल वर्करसाठी 04 जागा, मेकॅनिक (मोटर व्हेईकल)साठी 04 जागा, COPA साठी 88 जागा, वेल्डर (G & E)साठी 08 जागा, स्टेनोग्राफर (इंग्रजी)साठी 06 जागा आहेत.

  • नोकरीचं ठिकाण - नाशिक

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख - 10 ऑगस्ट 2022

  • तपशील - www.hal-india.co.in  (या वेबसाईटवर गेल्यावर careers वर क्लिक करा. Engagement of apprentice trainees at HAL-Nasik 2022-23 (ITI-Trades) या लिंकवर क्लिक करा. advertisement download करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)


रयत शिक्षण संस्था सातारा


पोस्ट - सहायक प्राध्यापक, शारीरिक शिक्षण संचालक



  • एकूण जागा - 261

  • नोकरीचं ठिकाण - सातारा

  • ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख - 29 जुलै 2022

  • तपशील - rayatshikshan.edu  (या वेबसाईटवर गेल्यावर recruitment मध्ये assistant professor on clock hour basis यावर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)


शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (GMC), नागपूर



  • पोस्ट - कनिष्ठ निवासी, गृह अधिकारी, निबंधक

  • शैक्षणिक पात्रता - MBBS, MCI/ MMC

  • एकूण जागा - 30

  • नोकरीचं ठिकाण - नागपूर

  • ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.

  • अर्ज पाठवण्याचा पत्ता - डीन कार्यालय, ‘इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सीए रोड, नागपूर – 440018

  • अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 25 जुलै 2022

  • तपशील - www.gmcnagpur.org 


नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प, वन विभाग गोंदिया



  • पोस्ट - पशुवैद्यकीय अधिकारी, अभियंता

  • शैक्षणिक पात्रता - पशुवैद्यकीय अधिकारी पदासाठी पदवीधर आणि अभियंता पदासाठी सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी

  • एकूण जागा - 02

  • नोकरीचं ठिकाण - गोंदिया

  • अर्ज पाठवण्याचा ईमेल आयडी - cfnntradv@gmail.com 

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख - 10 ऑगस्ट 2022

  • तपशील - mahaforest.gov.in