Bawaal Shooting Update : बॉलिवूड अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) आणि जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत. त्यांचा आगामी 'बवाल' (Bawaal) सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जान्हवी आणि वरुणने आता या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. जान्हवीने फोटो शेअर करत यासंदर्भात माहिती दिली आहे. 


वरुण-जान्हवीची ऑनस्क्रीन केमिस्ट्री


'बवाल' सिनेमाचे शूटिंग पोलंडमध्ये होत आहे. जान्हवीने वरुणसोबतचा एक खास फोटो शेअर करत यासंदर्भात माहिती दिली आहे. या सिनेमासाठी वरुण आणि जान्हवी दोघेही उत्सुक आहेत. या सिनेमाच्या माध्यमातून जान्हवी आणि वरुणची ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 






'बवाल' 7 एप्रिलला होणार रिलीज


'बवाल' सिनेमात वरुण आणि जान्हवी व्यतिरिक्त कोणते कलाकार असणार, सिनेमाचे कथानक काय असेल यासंदर्भात अद्याप भाष्य करण्यात आलेले नाही. पण या सिनेमाची रिलीज डेट मात्र समोर आली आहे. 7 एप्रिल 2023 रोजी 'बवाल' सिनेमा सिनेमागृहात रिलीज होणार आहे. नितेश तिवारी आणि साजिद नाडियावाला या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहेत. 


पोलंडमध्ये होणार 'बवाल'चे शूटिंग


जान्हवी कपूर सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या शूटिंगसंदर्भात चाहत्यांना माहिती देत असते. सध्या जान्हवीने वरुणसोबतचा खास फोटो शेअर करत आगामी सिनेमाचे शूटिंग सुरू झाल्याची माहिती चाहत्यांना दिली आहे. वरुणचा 'जुग जुग जियो' हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. तर जान्हवी कपूरचा 'गुड लक जॅरी' आणि 'मिस्टर अॅंड मिसेस माही' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


संबंधित बातम्या


Bawaal : वरुण धवन आणि जान्हवी कपूरचा 'बवाल' लवकरच होणार प्रदर्शित


Ekda Kay Zala : कौतुकास्पद! 'एकदा काय झालं'च्या शूटिंगदरम्यान 'प्लॅस्टिक बंदी', प्लॅस्टिकच्या बाटल्यांचा वापर टाळला