Job Majha : स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड चंद्रपूर (SAIL), एसटी महामंडळ जालना आणि सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. पात्र उमेदवारांनी या पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड चंद्रपूर (SAIL)
पोस्ट : वरिष्ठ सल्लागार, सल्लागार, वैद्यकीय अधिकारी, व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक, खाण फोरमॅन, सर्वेक्षक, ऑपरेटर कम टेक्निशियन, मायनिंग मेट, अटेंडंट कम टेक्निशियन, फायरमन.
शैक्षणिक पात्रता : DM/DNB,MBBS, पदव्युत्तर पदवी, BE / B.Tech (विस्ताराने माहिती तुम्हाला वेबसाईटवर पाहायला मिळेल.)
एकूण जागा : 259
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 डिसेंबर 2022
ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
नोकरीचं ठिकाण : चंद्रपूर
अधिकृत वेबसाईट : www.sailcareers.com
सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय
पोस्ट : विशेष सहाय्यक सरकारी वकील
शैक्षणिक पात्रता : कायद्याची पदवी
एकूण जागा : 28
नोकरीचं ठिकाण : सोलापूर
अर्ज पाठवण्याचा पत्ता : दुय्यम चिटणीस शाखा, जिल्हादंडाधिकारी सोलापूर
ऑफलाईन पद्धतीने तु्म्हाला अर्ज करायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 8 डिसेंबर 2022
तपशील : solapur.gov.in (या वेबसाईटवर गेल्यावर सूचनामध्ये भरतीवर क्लिक करा. संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
एसटी महामंडळ, जालना
पोस्ट : इंजिनिअर, मेकॅनिकल मोटार वेहिकल, इलेक्ट्रिशियन, मोटार व्हेईकल बॉडी बिल्डर, वेल्डर
शैक्षणिक पात्रता : इंजिनिअरिंग पदवी/ पदविका, १०वी उत्तीर्ण, संबंधित ट्रेडमध्ये ITI
एकूण जागा : 34 (यात इंजिनिअरसाठी 1 जागा, मेकॅनिकल मोटार वेहिकलसाठी 20 जागा, इलेक्ट्रिशियनसाठी 3 जागा, मोटार व्हेईकल बॉडी बिल्डरसाठी 9 जागा, वेल्डरसाठी 1 जागा आहे.)
वयोमर्यादा : 35 वर्षांपर्यंत
नोकरीचं ठिकाण : जालना
अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख : 7 डिसेंबर 2022
तपशील : www.msrtc.gov.in
अनेक तरुण सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात. अनेकदा वेळीच माहिती न मिळाल्यामुळे नोकरीची संधी हातातून जाते. त्यामुळेच नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण-तरुणींसाठी एबीपी माझा खाजगी आणि सरकारी क्षेत्रातील नोकरीसंबंधातील माहिती जॉब माझा या विशेष कॅटेगरीमध्ये दररोज प्रकाशिक करतं. वेगवेगळ्या कंपन्या, संस्थांतील नोकर भरतीबाबत जाणून घेण्यासाठी एबीपी माझाच्या वेबसाईटला नक्की भेट द्या.