Job Majha : नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरूणांसाठी आनंदाची बातमी आहे. स्टेट बॅंक ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. या भरीसाठी पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्झ करायचा आहे. स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये जवळपास दीड हजार पदांची भरती होत आहे. बॅंकिंग क्षेत्रात नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या उमदेवारांसाठी ही मोठी संधी आहे.
स्टेट बॅंक ऑफ इंडिया (SBI )
पोस्ट : सर्कल बेस्ड ऑफिसर्स (CBO)
शैक्षणिक पात्रता : पदवीधर, कोणत्याही प्रादेशिक ग्रामीण बँकेत अधिकारी म्हणून किमान दोन वर्षांचा अनुभव
एकूण जागा : 1 हजार 422
वयोमर्यादा : 21 ते 30 वर्ष
संपूर्ण देशभरात ही भरती होत आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 7 नोव्हेंबर 2022
तपशील : sbi.co.in (या वेबसाईटवर गेल्यावर careers वर क्लिक करा. Join SBI मध्ये current openings वर क्लिक करा. संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. advertisement download करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी
यात लक्षात घ्या अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. आधी अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 ऑक्टोबर होती ती आता 30 ऑक्टोबर करण्यात आली आहे. एकूण जागा 330 आहेत.
पोस्ट : कार्यकारी अभियंता
शैक्षणिक पात्रता : इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/ इन्स्ट्रुमेंटेशन/ इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक अँड कम्युनिकेशन/ पॉवर/ इलेक्ट्रिकल अँड पॉवर इंजिनिअर पदवी, नऊ वर्षांचा अनुभव
एकूण जागा : 73
पोस्ट : अतिरिक्त कार्यकारी अभियंता
शैक्षणिक पात्रता : इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/ इन्स्ट्रुमेंटेशन/ इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक अँड कम्युनिकेशन/ पॉवर/ इलेक्ट्रिकल अँड पॉवर इंजिनिअरिंग पदवी, सात वर्षांचा अनुभव
एकूण जागा : 154
पोस्ट : उपकार्यकारी अभियंता
शैक्षणिक पात्रता : इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/ इन्स्ट्रुमेंटेशन/ इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक अँड कम्युनिकेशन/ पॉवर/ इलेक्ट्रिकल अँड पॉवर इंजिनिअरिंग पदवी, तीन वर्षांचा अनुभव
एकूण जागा : 103
वयोमर्यादा : 38 ते 40 वर्ष
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 ऑक्टोबर 2022
तपशील : www.mahagenco.in (या वेबसाईटवर गेल्यावर career वर क्लिक करा. Advt. No. 09/2022 यावर क्लिक करा. तुम्हाला माहिती मिळेल.)