Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहेत याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. बजाज कॉलेज ऑफ सायन्स, कमला कॉलेज येथे विविध पदांसाठी पदांसाठी भरती सुरू आहे. अर्ज करण्यासाठी जाणून घ्या सविस्तर
बजाज कॉलेज ऑफ सायन्स वर्धा
पोस्ट - सहाय्यक प्राध्यापक
- शैक्षणिक पात्रता - UGC नियम 2018 नुसार
- एकूण जागा - 30
- ऑफलाईन, ऑनलाईन दोन्ही पद्धतीने तुम्ही अर्ज करु शकता.
- अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख - 3 सप्टेंबर 2022
- थेट मुलाखतीची तारीख - 6 सप्टेंबर 2022
- मुलाखतीचा पत्ता - बजाज कॉलेज ऑफ सायन्स, जमनालाल बजाज मार्ग, सिव्हिल लाईन्स, वर्धा - 442001
- तपशील - jbsw.shikshamandal.org (या वेबसाईटवर गेल्यावर उजव्या बाजूला असलेल्या quick links मध्ये appointments वर क्लिक करा. संबंधित पोस्टसंदर्भातली जाहिरात दिसेल. विस्ताराने तुम्हाला माहिती मिळेल.)
कमला कॉलेज, कोल्हापूर
पोस्ट - सहाय्यक शिक्षक, प्रयोगशाळा सहाय्यक
- शैक्षणिक पात्रता - सहाय्यक शिक्षक पदासाठी MCA/M.Sc. आणि प्रयोगशाळा सहाय्यक पदासाठी B.Sc.(comp.)/B.C.S./ D.C.P/ D.C.A./B.C.A.
- एकूण जागा - 03
- नोकरीचं ठिकाण - कोल्हापूर
- मुलाखतीतून निवड होणार आहे.
- मुलाखतीचा पत्ता - कमला कॉलेज, कोल्हापूर राजारामपुरी, पहिली गल्ली, कोल्हापूर
- मुलाखतीची तारीख - 8 सप्टेंबर 2022
- तपशील - kamalacollegekop.edu.in
जिल्हा परिषद, चंद्रपूर
पोस्ट - डेटा एन्ट्री ऑपरेटर
- शैक्षणिक पात्रता - बारावी पास, मराठी टायपिंग 30, इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि., MS-CIT
- एकूण जागा - 06
- वयोमर्यादा - 18 ते 43 वर्ष
- अर्ज पाठवण्याचा पत्ता - शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद चंद्रपूर.
- अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 6 सप्टेंबर 2022
- तपशील - zpchandrapur.maharashtra.gov.in (या वेबसाईटवर गेल्यावर news & announcements मध्ये शालेय पोषण आहार अंतर्गत कंत्राटी डाटा एन्ट्री ऑपरेटर पदाकरिता जाहिरात या लिंकवर क्लिक करा. advertisement download करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
राष्ट्रीय आरोग्य अभियान, चंद्रपूर
पोस्ट- वैद्यकीय अधिकारी, MPW, स्टाफ नर्स
- शैक्षणिक पात्रता - वैद्यकीय अधिकारी पदासाठी M.B.B.S किंवा समतुल्य पदवी, MPW साठी G.N.M. कोर्स/ B.sc नर्सिंग, स्टाफ नर्ससाठी बारावी सायन्स आणि सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स
- एकूण जागा - 132
- ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख - 6 सप्टेंबर 2022
- तपशील - chanda.nic.in