Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील.
भारत सरकारच्या दूरसंचार विभागात तसेच कृषी विमा कंपनी ऑफ इंडिया लि., मुंबई मनपाअंतर्गत अग्निशमन विभाग आणि राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी पुणे या ठिकाणी भरती सुरू आहे. त्यासाठी अर्ज कसा करायचा याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,
दूरसंचार विभाग
पोस्ट - उपविभागीय अभियंता
शैक्षणिक पात्रता - विद्यापीठाकडून अभियांत्रिकीमध्ये बॅचलर पदवी , 8 वर्षांचा अनुभव
एकूण जागा - 270
वयोमर्यादा - 56 वर्षांपर्यंत
संपूर्ण देशभरात ही भरती होत आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता - ADG-1(A & HR), DGT HQ, Room No 212, 2nd floor, UIDAII building, Behind Kali Mandir, New Delhi -110001.
अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 22 फेब्रुवारी 2023
तपशील - www.dot.gov.in (या वेबसाईटवर गेल्यावर vacancies वर क्लिक करा. संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. क्लिक करा. advertisement download करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
कृषी विमा कंपनी ऑफ इंडिया लि.
पोस्ट - व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी
शैक्षणिक पात्रता - पदवी, पदव्युत्तर पदवी
एकूण जागा - 50
वयोमर्यादा - 21 ते 30 वर्ष
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 5 फेब्रुवारी 2023
अधिकृत वेबसाईट - www.aicofindia.com
मुंबई मनपाअंतर्गत अग्निशमन विभाग
पोस्ट - फायर फायटर
शैक्षणिक पात्रता - 12वी उत्तीर्ण, फायर डिपोर्टमेंट भारती विद्यापीठातून शिक्षण पूर्ण, अनुभव
एकूण जागा - 910
ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 4 फेब्रुवारी 2023
अधिकृत वेबसाईट - mahafireservice.gov.in
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी पुणे
पोस्ट - लोअर डिव्हिजन क्लार्क (LDC), पेंटर, ड्रॉट्समन, सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर, कंपोझिटर-कम-पेंटर, सिनेमा प्रोजेक्शनिस्ट-II, कुक, फायरमन, लोहार, मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS)
शैक्षणिक पात्रता - 12वी पास, ITI, डिप्लोमा
एकूण जागा - 251
वयोमर्यादा - 18 ते 27 वर्ष
नोकरीचं ठिकाण - पुणे
ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 20 जानेवारी 2023
तपशील - www.nda.nic.in