Job Majha : न्यूक्लियर फ्यूएल कॉम्प्लेक्स (NFC), राष्ट्रीय आरोग्य अभियान उस्मानाबाद आणि भारतीय पोस्ट विभागात विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. दहावी पास आणि आयटीआय पास झालेले विद्यार्थी या पदांसाठी अर्ज करू शकतात. यासाठी पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. 


न्यूक्लियर फ्यूएल कॉम्प्लेक्स (NFC)


पोस्ट : ट्रेड अप्रेंटिस (यात अटेंडेंट ऑपरेटर (केमिकल प्लांट), इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक
फिटर, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, लॅब असिस्टंट, मशिनिस्ट, केमिकल प्लांट ऑपरेटर, टर्नर, कारपेंटर, COPA,
मेकॅनिक डिझेल, प्लंबर आणि वेल्डर)


शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण, संबंधित ट्रेडमध्ये ITI


एकूण जागा :  345


वयोमर्यादा : 18 वर्ष पूर्ण


ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.


अर्ज करण्याची शेवटची तारीख : 5 नोव्हेंबर 2022


तपशील :  www.nfc.gov.in  (या वेबसाईटवर गेल्यावर recruitment वर क्लिक करा. संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)


भारतीय पोस्ट विभाग


पोस्ट :  पोस्टल सहाय्यक, पोस्टमन, MTS


शैक्षणिक पात्रता :  पोस्टल असिस्टंटसाठी 12 वी पास, 60 दिवसांचा संगणक प्रमाणपत्र अभ्यासक्रमही करावा, पोस्टमनसाठी स्थानिक भाषेचे ज्ञान असलेले 12 वी पास. किमान 60  दिवसांचा संगणक प्रमाणपत्र अभ्यासक्रम, MTS साठी १०वी पास आणि स्थानिक भाषेचं ज्ञान.


एकूण जागा : 188


वयोमर्यादा : पोस्टल सहाय्यक, पोस्टमन पदासाठी 18 ते 27 वर्ष, MTS साठी 18 ते 25 वर्ष


ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.


अर्ज करण्याची शेवटची तारीख :  22 नोव्हेंबर 2022


तपशील :  dop sports recruitment.in   (या वेबसाईटवर गेल्यावर notifications वर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)


राष्ट्रीय आरोग्य अभियान, उस्मानाबाद


पोस्ट - स्टाफ नर्स, वैद्यकीय अधिकारी, एसटीएलएस, सांख्यिकी सहाय्यक, दंत सहाय्यक, सीटी स्कॅन तंत्रज्ञ, भूलतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, फिजिशियन, प्रसूती तज्ज्ञ, रेडिओलॉजिस्ट, सर्जन, ENT सर्जन, सुपर स्पेशालिस्ट कार्डिओलॉजिस्ट


शैक्षणिक पात्रता - GNM / B.Sc. Nursing, BAMS / BUMS, MD / DA/ DNB (विस्ताराने माहिती तुम्हाला वेबसाईटवर पाहायला मिळेल.)


एकूण जागा :  63


नोकरीचं ठिकाण :  उस्मानाबाद


ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे.


अर्ज पाठवण्याचा पत्ता :  राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, कक्ष क्रमांक २१८, दुसरा मजला, जिल्हा परिषद उस्मानाबाद


अर्ज करण्याची शेवटची तारीख : 9 नोव्हेंबर 2022


तपशील : osmanabad.gov.in (या वेबसाईटवर गेल्यावर notices मध्ये recruitment वर क्लिक करा. संंबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)