Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात (Job) आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहेत याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. महावितरण विभाग, अकोला, नेव्हल शिप रिपेअर यार्ड, अणु ऊर्जा विभाग या ठिकाणी विविध पदांसाठी भरती सुरू आहे, जाणून घ्या सविस्तर


महावितरण, अकोला


पोस्ट - इलेक्ट्रिशियन, वायरमन, कोपा


शैक्षणिक पात्रता - 10 वी पास, ITI


एकूण जागा - 53 (यात इलेक्ट्रिशियनसाठी 23, वायरमनसाठी 20, कोपासाठी 10 जागा आहेत.)


वयोमर्यादा - 18 वर्ष पूर्ण


अर्ज करण्याची शेवटची तारीख - 27 ऑक्टोबर 2022


अधिकृत वेबसाईट - www.mahadiscom.in


------------------------------------------------------------------------------



नेव्हल शिप रिपेअर यार्ड (NSRY)


पोस्ट - अप्रेंटिस (यात नेव्हल शिप रिपेअर यार्ड, कारवारमध्ये अप्रेंटिस हवेत आणि नेव्हल एअरक्राफ्ट रिपेअर यार्ड, गोवामध्ये अप्रेंटिस हवेत)


शैक्षणिक पात्रता - 10 वी उत्तीर्ण, संबंधित ट्रेडमध्ये ITI


एकूण जागा - 180 (यात कारवारमध्ये 150 तर गोव्यात 30 अप्रेंटिस हवेत)


वयोमर्यादा - 21 वर्षांपर्यंत


अर्ज करण्याची शेवटची तारीख - 20 नोव्हेंबर 2022


तपशील - www.indiannavy.nic.in


-----------------------------------------------------------------------------------
अणु ऊर्जा विभाग (DPSDAE )


पोस्ट - ज्युनियर पर्चेस असिस्टंट/ज्युनियर स्टोअर किपर


शैक्षणिक पात्रता - B.Sc/B.Com किंवा 60% गुणांसह मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग डिप्लोमा


एकूण जागा - 70


वयोमर्यादा - 18 ते 27 वर्ष


नोकरीचं ठिकाण - मुंबई


अर्ज करण्याची शेवटची तारीख - 10 नोव्हेंबर 2022


तपशील - dpsdae.formflix.in (या वेबसाईटवर गेल्यावर तुम्हाला संबंधित पोस्टसंदर्भातली जाहिरात दिसेल. notifications मध्ये english, hindi दोन्ही पर्याय दिसतील. तुम्हाला हव्या त्या पर्यायावर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)