On This Day In History : आजच्या दिवशी संयुक्त राष्ट्राची स्थापना झाली होती. दुसऱ्या महायुद्धानंतर शांतता कायम ठेवण्यासाठी संयुक्त राष्ट्राची स्थापना करण्यात आली होती.  24 ऑक्टोबरला प्रत्येक वर्षी संयुक्त राष्ट्र दिवस म्हणून साजरा केला जातो. त्याशिवाय भारताचे प्रसिद्ध कार्टूनिस्ट आर के लक्ष्मण यांचा जन्म 24 ऑक्टोबर रोजीच झाला होता. त्यांना कॉमन मॅन म्हणूनही ओळखलं जातं. आर.के लक्ष्मण यांनी देशातील स्वलंत मुद्द्यांना व्यंगचित्रातून रेखाटलं आहे. त्यांना पद्मभूषण, पद्मविभूषण आणि रॅमन मॅगसेसे पुरस्कारांनी सन्मानीत करण्यात आलं होतं. तसेच आजच्याच दिवशी भारतामधील पहिली मेट्रो सेवा सुरु झाली होती.  आजच्या दिवशी इतिहासात कोणकोणत्या महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या यांची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तसचं, आजच्या दिवशी असणारे दिग्गजांचे जन्मदिवस आणि निधन झालेल्या महत्वपूर्ण व्यक्तींबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत... 


देशातील पहिली भूमिगत मेट्रो -
24 ऑक्टोबर 1984 रोजी कोलकाता येथेच देशातील पहिली भूमिगत मेट्रो रेल्वे सुरू झाली होती. कोलकाता मेट्रोने 1984 साली आजच्या दिवशी कामकाज सुरू केले होते. त्यावेळी कोलकाता मेट्रोची पायाभरणी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते झाली होती.


कॉमन मॅन आरके लक्ष्मण यांचा जन्म -
कुंचल्याचा जादूगार आर. के. लक्ष्मण यांची आज जयंती आहे.  कॉमन मॅन, मालगुडी डेज, एशिनन पेंट्समधील गट्टू अशी अजरामर कार्टून्स आर के लक्ष्मण यांनी रेखाटली. 24 ऑक्टोबर 1921 रोजी म्हैसूरमध्ये त्यांचा जन्म झाला होता. आर के लक्ष्मण यांनी रेखाटलेला 'कॉमन मॅन' सर्वांच्याच काळजाला भिडला. त्याशिवाय त्यांनी कुंचल्यातून अनेक राजकीय घडामोडींवर अचूक भाष्य केलं होतं. 


जागितक पोलिओ दिवस -
आज जागतिक पोलिओ दिवस आहे. रोटरी इंटरनॅशनलने पोलिओ लसीचे जनक जोनस साल्क यांच्या स्मरणार्थ या दिनाची स्थापना करण्यात आली. दरवर्षी जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये पोलिओ रविवार साजरे केले जातात. 


संयुक्त राष्ट्राची स्थपना -
1945 मध्ये दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेतील सॅनफ्रान्सिस्को शहरात सभा आयोजित करण्यात आली होती. जगभरात शांतता प्रस्थापित व्हावी याकरिता यामध्ये चर्चा करण्यात आली. त्या सभेतील सुमारे पन्नास देशांनी एकत्र येवून देशांत शांतता प्रस्तापित व्हावी याकरिता एक विधायक तयार केले. त्यानंतर सर्वांनी हस्ताक्षर करत संयुक्त राष्ट्राची स्थापना करण्यात आली. 


जागतिक विकास माहिती (World Development Information Day 2022)-
आज जगभरात जागतिक विकास माहिती दिवस साजरा करण्यात येत आहे. 1972 मध्ये संयुक्त राष्ट्राने जागतिक विकास माहिती दिन स्थापित करण्याचा निर्णय घेतला.  


आजच्या दिवशी काय काय घडलं? 
1605 : अकबर यांच्या निधनानंतर  सलीम यांनी मुगल साम्राज्याची धुरा सांभाळली. इतिहासात सलीम यांना जहांगीर या नावानेही ओळखलं जातं.  
1775 : भारताचे अखेरचे मुगल सम्राट बहादुर शाह जफर यांचा जन्म
1851 : कोलकाता आणि  डायमंड हार्बर यादरम्यान अधिकृत टेलिग्राफ लाईन सुरु करण्यात आली. 
1914 :  स्वतंत्रता सेनानी लक्ष्मी सहगल यांचा जन्म
1921 : आर.के. लक्ष्मण यांचा जन्म
1945 : संयुक्त राष्ट्राची स्थापना
1954 : महान स्वतंत्रता सेनानी रफी अहमद किदवई यांचं निधन
1984 : भारताची पहिली मेट्रो सेवा सुरु
1997 : केरळमध्ये शिक्षण संस्थेत रॅगिंगवर बंदी घालण्यात आली. त्यानंतर देशभरातील शाळा-महाविद्यालयात रॅगिंगवर बंदी घालण्यात आली. 
2000 : भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे माजी अध्यक्ष सीताराम केसरी यांचं निधन
2000 :  समाजसेवक बाबा आमटे यांना केंद्र सरकारचा ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर‘ आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर 
2004 : ब्राझिलनं अवकाशात पाठवण्यात येणाऱ्या रॅकेटचं यशस्वी परीक्षण केलं.  
2013 : सुप्रसिद्ध भारतीय पार्श्व गायक मन्ना डे यांचं निधन
2017 : प्रसिद्ध ठुमरी गायिका गिरिजा देवी यांचं निधन