Prasar Bharati Jobs 2022 : जर तुम्ही नोकरीच्या (Job Majha) शोधात असाल, तर तुमच्यासाठी प्रसार भारतीत (Prasar Bharati) नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. प्रसार भारतीने भरती अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार काही पदांसाठी भरती केली जाणार आहे. या भरती मोहिमेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तसेच या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 नोव्हेंबर 2022 निश्चित करण्यात आली आहे.


या पदांसाठी भरती
नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. प्रसार भारतीमध्ये मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह आणि मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह ग्रेड-I या पदांसाठी भरती केली जाणार आहे. या भरती मोहिमेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. उमेदवार prasarbharati.gov.in या अधिकृत वेबसाइटवर भरतीशी संबंधित अधिसूचना पाहू शकतात. 


या शहरांसाठी होणार भरती


दिल्ली, मुंबई, कोलकाता, बंगलोर, शिमला, चंदीगड डेहराडूनसाठी ही भरती मोहीम आहे. भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमबीए किंवा पीजी डिप्लोमा (मार्केटिंग) असणे आवश्यक आहे. अर्जदारास इलेक्ट्रॉनिक मीडिया संस्थेमध्ये थेट विक्रीचा 1-4 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.


वय मर्यादा
अधिसूचनेनुसार, अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे कमाल वय 35 वर्षांपेक्षा जास्त नसावे.


निवड 'अशी' होणार
या पदांसाठी उमेदवारांची निवड लेखी चाचणी आणि मुलाखतीच्या आधारे केली जाईल.


अर्ज कसा करायचा?
भरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अधिसूचनेसाठी अधिकृत साइट पाहावी, त्यानंतर उमेदवाराने प्रसार भारतीच्या https://applications.prasarbharati.org या साइटला भेट देऊन अर्ज करावा. फॉर्म सबमिट करण्यात काही अडचण आल्यास, तुम्ही त्रुटीसह स्क्रीनशॉटसह hrcpbs@prasarbharati.gov.in वर ईमेल करू शकता.



IBPS भरतीसाठी अर्ज करण्याची आज शेवटची संधी 
बँकेत नोकरीसाठी संधीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. बँकेत SO पदांवरील भरती सुरु झाली आहे. इंस्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शनने (IBPS) SO पदांवरील भरतीसाठी अर्ज दाखल करण्याती आज शेवटची तारीख आहे. IBPS भरतीसाठी अर्ज करण्याची आज शेवटची संधी आहे. IBPS ही भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या मालकीची केंद्रीय भरती संस्था आहे. या IBPS संस्थेद्वारे राष्ट्रीय बँकामधील भरतीसाठी भरती प्रक्रिया राबवली जाते.


अनेक तरुण सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात. अनेकदा वेळीच माहिती न मिळाल्यामुळे नोकरीची संधी हातातून जाते. त्यामुळेच नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण-तरुणींसाठी एबीपी माझा खाजगी आणि सरकारी क्षेत्रातील नोकरीसंबंधातील माहिती जॉब माझा या विशेष कॅटेगरीमध्ये दररोज प्रकाशिक करतं. वेगवेगळ्या कंपन्या, संस्थांतील नोकर भरतीबाबत जाणून घेण्यासाठी एबीपी माझाच्या वेबसाईटला नक्की भेट द्या.


इतर महत्वाच्या बातम्या


Job Majha : जवाहरलाल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्चमध्ये विविध पदांसाठी भरती  


Education Loan Information:
Calculate Education Loan EMI