Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या (Job) शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहेत, याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. कोचीन शिपयार्ड लिमिटेड, युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. (UCIL), टाटा मेमोरियल सेंटर (मुंबई) या ठिकाणी भरती सुरू आहे. त्यासाठी काय पात्रता आहे, अर्ज कसा आणि कुठे करायचा याची माहिती सविस्तरपणे जाणून घ्या 



कोचीन शिपयार्ड लिमिटेड


पोस्ट - अप्रेंटिस (य़ात पदवीधर अप्रेंटिस, टेक्निशियन- डिप्लोमा अप्रेंटिस )


शैक्षणिक पात्रता - पदवीधर अप्रेंटिससाठी इंजिनिअरिंगमध्ये पदवी आणि टेक्निशियन डिप्लोमा अप्रेंटिससाठी इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा


एकूण जागा - 143


वयोमर्यादा - 18 वर्ष पूर्ण


ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.


अर्ज करण्याची शेवटची तारीख - 7 डिसेंबर 2022


तपशील - https://cochinshipyard.in (या वेबसाईटवर गेल्यावर career वर क्लिक करा. NOTIFICATION FOR ENGAGEMENT OF GRADUATE/TECHNICIAN (DIPLOMA) APPRENTICES UNDER APPRENTICES (AMENDMENT) ACT 1973 या लिंकवर क्लिक करा. संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची notification दिसेल. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)


-----------------------------------------------------------------------------


युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. (UCIL)


पोस्ट - अप्रेंटिस (यात फिटर, इलेक्ट्रिशियन, वेल्डर, टर्नर, मशिनिस्ट, इन्स्ट्रूमेंट मेकॅनिक, मेकॅनिक डिझेल, सुतार, प्लंबर यांचा समावेश आहे.)


शैक्षणिक पात्रता - 10 वी उत्तीर्ण, संबंधित ट्रेडमध्ये ITI


एकूण जागा - 239


वयोमर्यादा - 18 ते 25 वर्ष


ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.


अर्ज करण्याची शेवटची तारीख - 30 नोव्हेंबर 2022


तपशील - ucil.gov.in (या वेबसाईटवर गेल्यावर jobs वर क्लिक करा. संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)


---------------------------------------------------------------------


टाटा मेमोरियल सेंटर (मुंबई)


पोस्ट - डेटा एन्ट्री ऑपरेटर


शैक्षणिक पात्रता - 12 वी पास, संगणकाचा किमान 6 महिन्यांचा कोर्स किंवा MS-CIT प्रमाणपत्र, 1 वर्षाचा अनुभव


एकूण जागा - 4


नोकरीचं ठिकाण - मुंबई


थेट मुलाखतीतून निवड होणार आहे.


मुलाखतीचा पत्ता - रुम नं. 205, दुसरा मजला, सेंटर फॉर कॅन्सर एपीडिमिओलॉजी, अॅडवान्स सेंटर फॉर ट्रिटमेंट, रिसर्च अँड एज्युकेशन इन कॅन्सर, सेक्टर 22, खारघर, नवी मुंबई - 410210


मुलाखतीची तारीख - 21 नोव्हेंबर 2022


तपशील - www.actrec.gov.in (या वेबसाईटवर गेल्यावर career वर क्लिक करा. advertisement number - CCE/Advt/1031/2022 यावर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)