Job Majha: अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका
- पोस्ट – सहाय्यक परिचारिका प्रसाविका
- शैक्षणिक पात्रता – 10 वी पास आणि ANM कोर्स
- एकूण जागा – 34
- वयोमर्यादा – 18 ते 65 वर्ष
- नोकरीचं ठिकाण – कल्याण डोंबिवली- ठाणे
- ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
- थेट मुलाखत होणार आहे.
- मुलाखतीची तारीख – 11 आणि 12 एप्रिल 2022
- तपशील – www.kdmc.gov.in (या वेबसाईटवर गेल्यावर recruitment मध्ये view वर क्लिक करा. सुरुवातीलाच तुम्हाला संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. PDF फाईल डाऊनलोड करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल. )
गावंडे कॉलेज ऑफ फार्मसी, बुलढाणा
- पोस्ट - प्राचार्य, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक
- शैक्षणिक पात्रता – फार्मसीमध्ये पदव्युत्तर पदवी
- एकूण जागा – 28
- अर्ज पाठवण्याचा पत्ता – अध्यक्ष, नेहरू युवा क्रीडा/ सांप्रतिक मंडळ, गावंडे फार्मसी कॉलेज, साखरखेर्डा, ता. सिंदखेडराजा, जि. बुलढाणा – 443202
- अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख – 10 एप्रिल 2022
- तपशील - www.gawandepharmacycollege.org
राष्ट्रीय आरोग्य अभियान वर्धा
- पोस्ट - नेफ्रोलॉजिस्ट, बालरोगतज्ज्ञ, सर्जन, रेडिओलॉजिस्ट, ऍनेस्थेटिस्ट, मानसोपचारतज्ज्ञ, फिजिशियन/सल्लागार औषध, स्त्रीरोगतज्ज्ञ, ऑडिओमेट्रीशियन/ऑडिओलॉजिस्ट, कार्यक्रम सहाय्यक, वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक
- शैक्षणिक पात्रता – नेफ्रोलॉजिस्टसाठी DNB , Nepro, बालरोगतज्ज्ञ पदासाठी MD/DCH/DNB, सर्जन पदासाठी MS General Surgery, रेडिओलॉजिस्ट पदासाठी MD Radiology, ऍनेस्थेटिस्ट पदासाठी MD Anesthetist, मानसोपचारतज्ज्ञ पदासाठी MD/DPM/DNB, फिजिशियन/सल्लागार औषध पदासाठी MD Medicine, स्त्रीरोगतज्ज्ञ पदासाठी MD/MS ही पात्रता हवी
- एकूण जागा – 16
- नोकरीचं ठिकाण - वर्धा
- अर्ज पाठवण्याचा पत्ता - जिल्हा सामान्य रुग्णालय, वर्धा
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 एप्रिल 2022
- तपशील - wardha.gov.in (या वेबसाईटवर गेल्यावर सूचना मध्ये भरतीवर क्लिक करा. सुरुवातीलाच तुम्हाला संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. पीडीएफ फाईल डाऊनलोड करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
पंजाब नॅशनल बँक
- पोस्ट – शिपाई
- शैक्षणिक पात्रता – 12 वी उत्तीर्ण
- एकूण जागा – 12
- वयोमर्यादा – 18 ते 28 वर्ष
- ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
- अर्ज पाठवण्याचा पत्ता - मुख्य व्यवस्थापक, मानव संसाधन विभाग, पंजाब नॅशनल बँक, प्रगती टॉवर, प्लॉट क्र.-9, जी-ब्लॉक, वांद्रे – कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पूर्व), मुंबई- 400051
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 एप्रिल 2022
- तपशील - www.pnbindia.in