Job Majha :  अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. 


मुंबई उच्च न्यायालय


पोस्ट – कायदेशीर सहाय्यक / Legal Assistant



  • शैक्षणिक पात्रता- कायद्याची पदवी

  • एकूण जागा - 03

  • वयोमर्यादा – 21 ते 28 वर्ष

  • नोकरीचं ठिकाण- औरंगाबाद

  • ऑफलाईन पद्धतीने अर्ज पाठवायचा आहे.

  • अर्ज पाठवण्याचा पत्ता - The Secretary, High Court Legal Services Sub-Committee, High Court Bench at Aurangabad, Jalna Road, Aurangabad-431009.

  • अर्ज पोहोचवण्याची शेवटची तारीख – 16 जून 2022

  • तपशील - www.bombayhighcourt.nic.in  (या वेबसाईटवर गेल्यावर recruitment वर क्लिक करा. संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)


मिलिटरी हॉस्पिटल, अहमदनगर


यात ग्रुप सी पदाच्या 67 जागांसाठी भरती निघाली आहे.


पहिली पोस्ट – वॉर्ड सहाय्यिका



  • शैक्षणिक पात्रता – दहावी उत्तीर्ण

  • एकूण जागा – 57

  • वयोमर्यादा – 18 ते 25 वर्ष

  • अर्ज पोहोचवण्याची शेवटची तारीख – 24 जुलै 2002

  • तपशील- indianarmy.nic.in 


दुसरी जागा – कुक



  • शैक्षणिक पात्रता – दहावी उत्तीर्ण, भारतीय स्वयंपाकाचं ज्ञान

  • एकूण जागा – 10

  • वयोमर्यादा – 18 ते 25 वर्ष

  • ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.

  • अर्ज पोहोचवण्याची शेवटची तारीख – 24 जुलै 2022

  • तपशील- indianarmy.nic.in


डॉन बॉस्को कॉलेज ऑफ अॅग्रीकल्चर, गोवा


एकूण 25 जागांसाठी भरती होत आहे.


पोस्ट – सहाय्यक प्राध्यापक



  • शैक्षणिक पात्रता - ICAR मान्यताप्राप्त विद्यापीठातून NET सह MSC/इंग्रजीमध्ये MA

  • एकूण जागा – 24

  • अर्ज पाठवण्याचा पत्ता - DON BOSCO COLLEGE OF AGRICULTURE (A Grant -in –Aid institution affiliated to Goa University Sulcorna, Quepem, Goa- 403705

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख -  24 जून 2002

  • तपशील - donboscocollegeofagriculture.com


पोस्ट – समुपदेशक



  • शैक्षणिक पात्रता- मान्यताप्राप्त विद्यापीठातून मानसशास्त्र/मानव विकासात मास्टर

  • एकूण जागा – 01

  • नोकरीचं ठिकाण – गोवा

  • ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.

  • अर्ज पाठवण्याचा पत्ता - DON BOSCO COLLEGE OF AGRICULTURE (A Grant -in –Aid institution affiliated to Goa University Sulcorna, Quepem, Goa- 403705

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख -  24 जून 2022

  • तपशील - donboscocollegeofagriculture.com