Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहेत याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर आणि बँक ऑफ बडोदा या ठिकाणी नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. त्यासाठी काय पात्रता आहे, अर्ज कसा आणि कुठे करायचा यासंबंधी सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,
राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई
पोस्ट - शहर कार्यक्रम व्यवस्थापक, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक
शैक्षणिक पात्रता - MBBS/ BDS
एकूण जागा - 111
वयोमर्यादा - 18 ते 38 वर्ष
अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 25 जुलै 2022
तपशील - arogya.maharashtra.gov.in
टीएचडीसी इंडिया लिमिटेड (टिहरी हायड्रो डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड)
पोस्ट - इंजिनिअरिंग ट्रेनी सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल
शैक्षणिक पात्रता - B.E/B.Tech/B.Sc अभियांत्रिकी इन सिव्हिल/इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल
2022 ची GATE परीक्षा दिली असावी
एकूण जागा - 45
वयोमर्यादा - 30 वर्षांपर्यंत
ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 1 ऑगस्ट 2022
तपशील - www.thdc.co.in (या वेबसाईटवर गेल्यावर career मध्ये job opportunities मध्ये new openings वर क्लिक करा. तुम्हाला संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. advertisement download करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर
पोस्ट - कनिष्ठ निवासी
शैक्षणिक पात्रता - MCI/ NMC पदव्युत्तर पदवी, DNB
एकूण जागा - 20
नोकरीचं ठिकाण - सोलापूर
ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
अर्ज करण्याचा पत्ता - वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 11 जुलै 2022
मुलाखतीद्वारे निवड होणार आहे. मुलाखतीची तारीख - 14 जुलै 2022
तपशील - vmgmc.edu.in (या वेबसाईटवर गेल्यावर news & notices मध्ये संबंधित पोस्टची जाहिरातीची लिंक दिसेल. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
बँक ऑफ बडोदा
पोस्ट – वरिष्ठ व्यवस्थापक, मुख्य व्यवस्थापक
शैक्षणिक पात्रता – फायनान्समध्ये पदव्युत्तर पदवी/ CFA/ ICWA/CMA
एकूण जागा – 15
नोकरीचं ठिकाण – मुंबई
ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 जुलै 2022
तपशील - www.bankofbaroda.in (या वेबसाईटवर गेल्यावर about us मध्ये careers वर क्लिक करा. Current opportunities वर क्लिक करा. Recruitment of Chartered Accountant Specialist Officers on Regular basis यावर क्लिक करा. Advertisement download करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)