Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. भारतीय पोस्ट ऑफिस येथे नोकरीच्या संधी आहेत.


>> मुंबई पोर्ट ट्रस्ट


एकूण 9 जागांसाठी भरती होत आहे.


पहिली पोस्ट – उपमुख्य यांत्रिकी अभियंता


शैक्षणिक पात्रता - मेकॅनिकल इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनीअरिंगमध्ये पदवी किंवा समतुल्य, १२ वर्षांचा अनुभव


एकूण जागा – 8


वयोमर्यादा – 42 वर्षांपर्यंत


अर्ज पाठवण्याचा पत्ता - सचिव, मुंबई बंदर प्राधिकरण, पोर्ट हाऊस, दुसरा मजला, S.V.मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई- 400001


अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22,23,27 जून 2022 (विस्ताराने माहिती तुम्हाला वेबसाईटवर पाहायला मिळेल.)


तपशील - www.mumbaiport.gov.in


 


> दुसरी पोस्ट – उपमुख्य दक्षता अधिकारी


शैक्षणिक पात्रता – पदवीधर


एकूण जागा – 1


वयोमर्यादा – 42 वर्षांपर्यंत


अर्ज पाठवण्याचा पत्ता - सचिव, मुंबई बंदर प्राधिकरण, पोर्ट हाऊस, दुसरा मजला, S.V.मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई- 400001


अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22,23,27 जून 2022  (विस्ताराने माहिती तुम्हाला वेबसाईटवर पाहायला मिळेल.)


तपशील - www.mumbaiport.gov.in


 


>> युरेनियम कॉर्पोरेशन (UCIL )


विविध पदांच्या 130 जागांसाठी भरती निघाली आहे.


> पहिली पोस्ट – मायनिंग मेट


शैक्षणिक पात्रता – 12 वी उत्तीर्ण


एकूण जागा – 80


वयोमर्यादा – 30 र्षांपर्यंत


अर्ज करण्याची शेवटची तारीख – 5 जून 2022


तपशील – ucil.gov.in 


 


> दुसरी पोस्ट – ब्लास्टर


शैक्षणिक पात्रता – 10 वी उत्तीर्ण


एकूण जागा – 20


वयोमर्यादा – 30  वर्षांपर्यंत


अर्ज करण्याची शेवटची तारीख – 5 जून 2022


तपशील – ucil.gov.in


 


> तिसरी पोस्ट - वाइंडिंग इंजिन ड्रायव्हर


शैक्षणिक पात्रता – 10 वी उत्तीर्ण


एकूण जागा – 30


वयोमर्यादा – 30 वर्षांपर्यंत


अर्ज करण्याची शेवटची तारीख – 5 जून 2022


तपशील – ucil.gov.in  (या वेबसाईटवर गेल्यावर jobs वर क्लिक करा. Advt No-02-2022 regarding apprenticeship in UCIL या लिंकवर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)


 


 >> महावितरण, नाशिक


पोस्ट – इलेक्ट्रिशियन, वायरमन


शैक्षणिक पात्रता – 10 वी उत्तीर्ण, संबंधित ट्रेडमध्ये ITI


एकूण जागा – 149


वयोमर्यादा – 18 ते 21 वर्षांपर्यंत


अर्ज पाठवण्याचा पत्ता – अधिक्षक अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, नाशिक मंडल कार्यालय, विद्युत भवन, बिटको पॉईंट, नाशिक रोड, नाशिक – 422101


अर्ज करण्याची शेवटची तारीख – 3 जून 2022


तपशील - www.mahatransco.in