Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहेत याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील.
स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC)
पदाचे नाव :
1) स्टेनोग्राफर, ग्रेड ‘C’ (ग्रुप ‘B’)
2) स्टेनोग्राफर, ग्रेड ‘D’ (ग्रुप ‘C’)
शैक्षणिक पात्रता: 12 वी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण
एकूण जागा : पद संख्या तूर्तास निर्दिष्ट नाही.
वयोमर्यादा - 18 ते 30 वर्षे
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 5 सप्टेंबर 2022
परीक्षा (CBT): नोव्हेंबर 2022
अधिकृत संकेतस्थळ : ssc.nic.in
-----------------
महिला व बाल विकास विभाग
एकूण जागा : 16
1) सहाय्यक / Assistant
शैक्षणिक पात्रता : 1)पदवीधर 02) संगणकाचे ज्ञान आवश्यक 03) इंग्लिश टायपिंग 40 श.प्र.मि. 04) मराठी टायपिंग 40 श.प्र.मि. 05) अनुभव असल्यास प्राधान्य
एकूण जागा - 08
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 1 सप्टेंबर 2022
वयाची अट : 25 वर्षे ते 45 वर्षापर्यंत.
अधिकृत संकेतस्थळ : www.gondia.gov.in
---------
बहुउद्देशीय कर्मचारी
शैक्षणिक पात्रता : 1) पदवीधर 2) संगणकाचे ज्ञान आवश्यक 3) इंग्लिश टायपिंग 40 श.प्र.मि. 04) मराठी टायपिंग 40 श.प्र.मि. 05) अनुभव असल्यास प्राधान्य
एकूण जागा - 08
वयाची अट : 25 वर्षे ते 45 वर्षापर्यंत.
नोकरी ठिकाण : गोंदिया (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, गोंदिया.
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 1 सप्टेंबर 2022
अधिकृत संकेतस्थळ : www.gondia.gov.in
-----
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
सहाय्यक प्राध्यापक
शैक्षणिक पात्रता : पदव्युत्तर पदवी किमान 55% गुणांसह किंवा मान्यताप्राप्त परदेशी विद्यापीठातून समतुल्य पदवी किंवा पीएच.डी. किंवा बी.ई./ बी.टेक./ बी.एस आणि एम.ई. / एम.टेक. / एम.एस.
एकूण जागा : 133
नोकरी ठिकाण : पुणे
अर्ज पद्धती : ऑनलाईन किंवा ईमेल द्वारे
E-Mail ID (कनिष्ठ संशोधन सहकारी) : rohinibhawar@gmail.com
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 ऑगस्ट 2022
अधिकृत संकेतस्थळ : www.unipune.ac.in