Job Change: नोकरदारांच्या (Job) संदर्भातील एक जागतिक अहवाल (Report) समोर आला आहे. ज्यामध्ये असा दावा करण्यात आला आहे की, एकूण 8 देशांतील कंपन्यांमध्ये अॅट्रिशन रेट म्हणजेच सध्याची कंपनी सोडून दुसऱ्या कंपनीत जाण्याची प्रक्रिया जवळपास 28 टक्के असणार आहे. म्हणजेच 28 टक्के कर्मचाऱ्यांनी सध्याची नोकरी सोडून इतर कंपन्यांमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. भारतातही असे होऊ शकते. बोस्टन कन्सल्टिंग ग्रुपच्या (BCG) जागतिक अहवालात ही बाब समोर आली आहे. कर्मचारी केवळ त्यांच्या पगार आणि कंपनीतील पदावरच नाही तर इतर गरजांबाबतही असमाधानी असतात. कंपन्यांसाठी ही धोक्याची घंटा ठरण्याची शक्यता आहे.
फक्त पगार किंवा पद हेच कारण नाही
या सर्वेक्षणात एक धक्कादायक बाब समोर आली आहे की, जवळपास 28 टक्के कर्मचारी पुढील एका वर्षात त्यांच्या सध्याच्या संस्थेत दिसणार नाहीत.त्यांचे कर्मचारी का खूश नाहीत आणि त्यांना नोकरी का बदलायची आहे याची कंपन्यांनी काळजी घेतली पाहिजे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या कंपन्या केवळ पगार, पैसा आणि पद, या बाबतीतच नाही तर इतर भावनिक गरजा पूर्ण करण्यातही अपयशी ठरत आहेत. यावर कोणतीही चर्चा होत नाही. या विषयावर आणखी चर्चा होण्याची गरज असल्याचे सर्वेक्षणातील बहुतांश लोकांनी सांगितले.
या 8 देशांमध्ये सर्वेक्षण
एकूण 8 देशांतील 11,000 कर्मचार्यांमध्ये BCG ने एक नवीन सर्वेक्षण केले आहे. त्यामध्ये विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे कोणत्या कारणांमुळे कर्मचार्यांना नोकरी सोडण्यास भाग पाडतात हे समोर आले आहे. BCG चे नवीन कर्मचारी समाधान सर्वेक्षण भारतासह आणखी 7 देशांमध्ये करण्यात आले असून यामध्ये ऑस्ट्रेलिया, जपान, अमेरिका, युनायटेड किंगडम, कॅनडा, फ्रान्स आणि जर्मनी या देशातील विविध कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.
लोकांना एकूण 20 गरजांबाबत प्रश्न विचारण्यात
BCG ने लोकांना एकूण 20 गरजांबद्दल प्रश्न विचारले, त्यापैकी निम्मे पगार आणि कामाचे तास आणि इतर फायदे यासारख्या कार्यात्मक गरजांशी संबंधित होते. निम्मे प्रश्न भावनिक गरजांवर आधारित विचारले गेले. उदाहरणार्थ- त्यांना कंपनीत मिळत असलेल्या पगारावर ते आनंदी आहेत का? त्यांना त्यांच्या कामाचा आनंद आहे की नाही? कर्मचार्यांना संस्थेत पाठिंबा मिळतो की नाही? असे प्रश्न त्यांना विचारण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या: