अहमदनगर श्रीक्षेत्र शनि शिंगणापूर संस्थानचे (Shri Shaneshwar Devasthan Shanishingnapur)  विशेष ऑडिट करण्यात येईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानपरिषदेत (VidhanParishad) दिली आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या लक्षवेधीनंतर सरकारने मोठी घोषणा केली आहे. शनिशिंगणापूर देवस्थान ट्रस्टमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार होत असल्याचं आरोप होत होते.


शनिशिंगणापूर देवस्थान मध्ये 65 कर्मचाऱ्यांची आवश्यकता असताना 1800 कर्मचारी हे देवस्थानमध्ये काम करत असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. 65 कर्मचाऱ्यांपैकी देखील केवळ 12 कर्मचारीच हे कामावर येत असून बाकीच्यांना घरबसल्या पगार मिळत असल्याचा मुद्दा बावनकुळे यांनी मांडला. सोबतच शनिशिंगणापूर येथील चौथर्‍यावर जाण्यासाठीची पाचशे रुपयांची पावती ही संस्थामामध्ये न बनवता ती बाहेरच बनवली गेली असल्याचा आरोप बावनकुळे यांनी केला आणि या पावतीच्या माध्यमातून दोन कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला.संबंधित देणगी ही शैनेश्वर नावाच्या खासगी शाळेच्या नावावरती वसूल केली असल्याचं बावनकुळे यांनी म्हटलं.


उच्चस्तरीय चौकशी करण्याची बावनकुळेंची मागणी


 शनिशिंगणापूर येथे 24 तास वीज असताना देखील 40 लाख रुपयांचे डिझेल प्रत्येक महिन्याला जनरेटरसाठी वापरले असल्याचं बावनकुळे यांनी म्हटलं आहे.. त्यामुळे शनिशिंगणापूर देवस्थानला मागच्या दहा वर्षांमध्ये जेवढे काही दान आले आहे आणि त्याचा खर्च कुठे झाला याबाबत उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले आश्वासन


याला उत्तर देताना राज्याच्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील शनिशिंगणापूर देवस्थान मध्ये भ्रष्टाचार झाल्याचं म्हणत याबाबत लवकरच उच्चस्तरीय चौकशी केली जाईल असं म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वी शनिशिंगणापूर येथील भ्रष्टाचाराबाबत ऋषिकेश शेटे या युवकांना उपोषण सुरू केले होते या उपोषणाला चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील भेट दिली होती आणि हा प्रश्न अधिवेशनामध्ये उपस्थित करू अस आश्वासन दिलं होतं, त्यानुसार हा प्रश्न आता अधिवेशनात आल्यानं या संदर्भामध्ये चौकशी होणार आहे. हा प्रश्न अधिवेशनात उपस्थित केल्याने शनिशिंगणापूर येथील युवकांनी फटाके फोडून जल्लोष केला.


सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याला पाठवून करणार चौकशी 


लक्षवेधीची दखल घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी करण्याचे, संस्थांच्या सर्व व्यवहारांचे ऑडिट करण्याचे व लवकरात लवकर शनेश्वर देवस्थान विश्वस्त अधिनियम 2018 ची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले.तसेच सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याला पाठवून चौकशी करण्यात येईल आणि 2 महिन्यात अहवाल घेण्यात येईल. 


हे ही वाचा :


Shani Dev : नव्या वर्षात जगाला सतावणार शनीची डोकेदुखी; भारतात नैसर्गिक आपत्तीसह राजकीय संकटांचा उद्रेक