ITBP SI Recruitment 2022 : तुम्ही दहावी पास असाल आणि सरकारी नोकरीची संधी शोधत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. इंडो-तिबेट सीमा सुरक्षा दलात (ITBP) दहावी पास उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी आहे. या भरती अंतर्गत  उपनिरीक्षक (Sub Inspector) ग्रुप बी पदांवर भरती करण्यात येणार आहे. या भरतीसाठी अर्जाची प्रक्रिया 16 जुलैपासून सुरु करण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवार recruitment.itbpolice.nic.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करु शकतात. या भरतीसाठीची शेवटची तारीख 14 ऑगस्ट 2022 आहे.


रिक्त जागांचा तपशील
इंडो-तिबेट सीमा सुरक्षा दलात (ITBP) उपनिरीक्षक पदासाठी (Sub Inspector) 37 जागांवर भरती करण्यात येणार आहे. यामध्ये पुरुषांसाठी 32 पदांवर भरती करण्यात येणार असून यात खुल्या प्रवर्गातील - 07 पदे, SC - 02, ST - 02, OBC - 15, EWS - 03 अशा रिक्त जागांसाठीचा तपशील आहे. तर महिलांसाठी 05 पदांवर भरती करण्यात येईल. यामध्ये खुल्या प्रवर्गातील - 01 पदं, SC - 02, OBC - 01 या पदांवर भरती करण्यात येईल.


कशी असेल निवड प्रक्रिया?
या भरतीसाठी निवड प्रक्रिया लेखी परीक्षा, पीईटी आणि पीएसटीद्वारे उमेदवारांची निवड केली जाईल. लेखी परीक्षेत पास होणाऱ्या उमेदवारांना पुढील परीक्षेसाठी बोलावलं जाईल. 


पगार जाणून घ्या
उपनिरीक्षक (निरीक्षक) या पदांसाठी निवडलेल्या पुरुष आणि महिला उमेदवारांना 35,400 रुपये ते 1,12,400 रुपये प्रति महिना वेतन दिले जाईल.


शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा
या भरतीसाठी दहावी पास आणि सिव्हिल इंजिनीअरिंग डिप्लोमा असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. यासोबतच अर्जदारांचे वय 20 ते 25 वर्षांच्या दरम्यान असावे. वयोमर्यादेत शिथिलता आणि या भरतीशी संबंधित इतर माहितीसाठी, उमेदवार जारी केलेली अधिसूचना पाहू शकतात.


असा करा अर्ज



  • पायरी 1 : इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट recruitment.itbpolice.nic.in ला भेट देऊन अर्ज करु शकतात.

  • पायरी 2 : होमपेजवर दिलेल्या नवीन नोंदणी पर्यायावर क्लिक करा.

  • पायरी 3 : मेल आयडी लिहून येथे नोंदणी करा.

  • पायरी 4 : ITBP SI Recruitment 2022 साठीचा पर्याय निवडा.

  • पायरी 5 : तपशील आणि कागदपत्रे अपलोड करा.

  • पायरी 6 : योग्य तपशील भरून अर्ज जमा करा.


महत्त्वाच्या इतर बातम्या