ITBP Constable Recruitment 2022 : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहेत याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. 


तुम्ही दहावी पास असाल आणि सरकारी नोकरीची संधी शोधत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. इंडो-तिबेट सीमा सुरक्षा दलात (ITBP) दहावी पास उमेदवारांना नोकरीची (ITBP Constable Recruitment 2022) सुवर्णसंधी आहे. या भरती अंतर्गत हवालदार (Constable) पदांवर भरती करण्यात येणार आहे. या भरतीसाठी अर्जाची प्रक्रिया 19 ऑगस्ट 2022 पासून सुरु झाली आहे. इच्छुक उमेदवार recruitment.itbpolice.nic.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करु शकतात. या भरतीसाठीची शेवटची तारीख 17 सप्टेंबर 2022 आहे.


ITBP Constable Recruitment 2022 : महत्त्वाच्या तारखा


अर्ज प्रक्रिया सुरु झाल्याची तारीख : 19 ऑगस्ट 2022 
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख : 17 सप्टेंबर 2022 


ITBP Constable Recruitment 2022 : रिक्त जागांचा तपशील


इंडो-तिबेट सीमा सुरक्षा दलात (ITBP)  हवालदार (Constable) पदांसाठी 108 जागांवर भरती करण्यात येणार आहे. यामध्ये कॉन्स्टेबल (सुतार) 56 पदे, हवालदार (गवंडी) 31 पदे आणि हवालदार (प्लंबर) 21 पदांवर भरती करण्यात येणार आहे.


ITBP Constable Recruitment 2022 : शैक्षणिक पात्रता


या भरतीअंतर्गत नोकरी मिळण्यास इच्छुक उमेदवाराने कोणत्याही मान्यता प्राप्त बोर्डातून दहावी पास असणं आवश्यक आहे.


ITBP Constable Recruitment 2022 : वयोमर्यादा


या भरतीसाठी अर्जदारांचे वय 18 ते 23 वर्षांच्या दरम्यान असावे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत सूट असेल. वयोमर्यादेत शिथिलता आणि या भरतीशी संबंधित इतर माहितीसाठी, उमेदवार जारी केलेली अधिसूचना पाहू शकतात.


ITBP Constable Recruitment 2022 : कशी असेल निवड प्रक्रिया?


या भरतीसाठी निवड प्रक्रिया लेखी परीक्षा, पीईटी आणि पीएसटीद्वारे उमेदवारांची निवड केली जाईल. लेखी परीक्षेत पास होणाऱ्या उमेदवारांना पुढील परीक्षेसाठी बोलावलं जाईल. अधिक माहितीसाठी उमेदवार भरतीची अधिकृत अधिसूचना वाचू शकतात.


महत्त्वाच्या इतर बातम्या