Indian Army Recruitment 2022 : भारतीय सैन्यात महिला अग्निवीर भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख आता जवळ आली आहे. उमेदवार Joinindianarmy.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. या भरती मोहिमेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 7 सप्टेंबर 2022 आहे.
Indian Army Agniveer Recruitment 2022: शैक्षणिक पात्रता
अधिसूचनेनुसार, या भरती मोहिमेसाठी अर्ज करण्यासाठी, अर्जदार कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळातून 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. उमेदवाराने दहावी परीक्षेतील प्रत्येक विषयात किमान 45 टक्के आणि 33 टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी.
Indian Army Agniveer Recruitment 2022: वय श्रेणी
या भरती मोहिमेसाठी अर्ज करणाऱ्या महिला अर्जदारांचे वय 17 ते 23 वर्षे दरम्यान असावे.
Indian Army Agniveer Recruitment 2022: प्रवेशपत्र कधी येणार
या भरती मोहिमेचे प्रवेशपत्र 12 ते 13 ऑक्टोबर 2022 दरम्यान उमेदवारांना त्यांच्या ईमेलवर पाठवले जाईल. भरती मोहिमेशी संबंधित अधिक माहितीसाठी, उमेदवार अधिकृत साइटची मदत घेऊ शकतात.
Indian Army Agniveer Recruitment 2022: असा अर्ज करा
1: या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी, प्रथम Joinindianarmy.nic.in या अधिकृत साइटवर जा.
2: यानंतर, उमेदवार होमपेजवर दिलेल्या अग्निपथ विभागावर क्लिक करा.
3: आता अर्जदाराने ऑनलाइन अर्ज करा वर क्लिक करा.
4: यानंतर, उमेदवार त्यांचा ईमेल आयडी टाकून करून नोंदणी करतील.
5: त्यानंतर अर्ज प्रक्रिया सुरू होईल
6: आता उमेदवारांना आवश्यक तपशील आणि कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
7: त्यानंतर उमेदवार फॉर्म सबमिट करा.
8: शेवटी, उमेदवारांनी फॉर्मची प्रिंट आउट घ्यावी.
अग्निवीरच्या धर्तीवर कर्मचाऱ्यांची बँकांमध्येही होणार भरती
लष्करातील अग्निवीरांच्या (Agniveer) धर्तीवर आता बँकांमध्येही कर्मचाऱ्यांना (Employees) सामावून घेतले जाणार आहे. या कर्मचाऱ्यांना कंत्राटी पद्धतीने कामावर घेण्यात येणार आहे. देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank Of India) आपला खर्च कमी करण्यासाठी मानव संसाधनाशी संबंधित समस्यांसाठी स्वतंत्र कंपनी सुरू करणार आहे. स्टेट बँकेच्या ऑपरेशन आणि सपोर्ट उपकंपनीला अलीकडेच भारतीय रिझर्व्ह बँकेकडून (RBI) तत्वतः मान्यता मिळाली आहे. सुरुवातीला, कंपनी ग्रामीण आणि निमशहरी भागातील बँक शाखांमधील कर्मचाऱ्यांचे व्यवस्थापन करणार आहे.
संबंधित बातम्या