नागपूर: महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) आगामी दोन महिन्यांमध्ये महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागातंर्गत विभिन्न संवर्गातील तब्बल 961 जागांसाठी मेगा भरती केली जाणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून स्पर्धा परीक्षांची तयारी करू इच्छिणाऱ्या राज्यातील विद्यार्थ्यांसाठी या परीक्षा सुवर्णसंधी राहील. त्यातील 161 पदांवरील भरतीकरिता उद्या रविवारी (दि.21) ऑगस्ट रोजी राज्य सेवेची (2022) पूर्व परीक्षा राज्यातील 37 जिल्हा केंद्रांवर घेण्यात येईल. पूर्व परीक्षेच्या निकालानंतर पात्र झालेल्या उमेदवारांची मुख्य परीक्षा 21 ते 23 जानेवारी 2023 या दरम्यान होईल. एमपीएससीतर्फे राज्य शासनाच्या विभागांतर्गत विविध संवर्गातील एकूण 800 पदांची भरती होणार असून त्यासाठी आयोगातर्फे महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट- ब संयुक्त पूर्व परीक्षा 2022 ही येत्या 8 ऑक्टोबर रोजी घेतली जाणार आहे. 

पद पहिल्यांदा एमपीएससीद्वारे

दुय्यम निबंधक व मुद्रांक निरिक्षक हे पद पहिल्यांदा एमपीएससीद्वारे भरले जात आहे. पूर्व परीक्षेच्या निकालाच्या आधारे मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांकरिता मुख्य परीक्षा डिसेंबर 2022 नंतर होईल. पूर्व परीक्षा 100 गुणांसाठी तर मुख्य परीक्षा 400 गुणांसाठी होईल. पोलिस उपनिरीक्षक पदासाठी शारिरीक चाचणी 100 गुण व मुलाखत 40 गुण या प्रमाणे होईल. आयोगाच्या संकेतस्थळावर अधिक माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या पदांसाठी होईल भरती

  • दुय्यम सेवा अराजपत्रित, गट- ब संयुक्त पूर्व परीक्षा 2022
  • सहाय्यक कक्ष अधिकारी, गट- ब- 42
  • राज्य कर निरीक्षक- 77
  • पोलिस उपनिरीक्षक- 603
  • दुय्यम निबंधक, मुद्रांक निरीक्षक- 78 पदेएकूण- 800 पदे

देवेंद्र फडणवीसांनी बाळासाहेबांच्या नावाने मते मागणे म्हणजे, मोदी पर्व संपल्याचीच ही नांदी आणि कबूली! उद्धव ठाकरेंचा घणाघात 

राज्य सेवा पूर्व परीक्षा 2022

  • सहाय्यक संचालक, वित्त व लेखा सेवा गट- अ- 9
  • मुख्याध्याधिकारी, नगरपालिका / परिषद, गट- अ- 22
  • बाल विकास प्रकल्प अधिकारी, गट- अ व तत्सम- 28
  • सहाय्यक आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, गट- ब- 2
  • उप अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गट- ब- 3
  • कक्ष अधिकारी, गट- ब- 5
  • सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, गट-ब- 4
  • निरीक्षक प्रमाणित शाळा व संस्था तसेच तत्सम- 88

मुंबईतील प्रसिद्ध ‘सुविधा’ शोरूमच्या संचालकाचा मृत्यू, विष पिऊन आत्महत्या केल्याचा संशय