IPPB Recruitment 2022 : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक लिमिटेडमध्ये (IPPB) अनेक रिक्त पदांवर भरती सुरु आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा. कारण अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचे दोन दिवस उरले आहेत. या भरती अंतर्गत एकूण 650 रिक्त पदांवर भरती करण्यात येणार आहे. या भरतीमध्ये मॅनेजर, सीनियर मॅनेजर यासह अनेक पदांवर भरती करण्यात येणार आहे. त्यामुळे नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी ही चांगली संधी आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 सप्टेंबर 2022 आहे. त्यामुळे या संधीचा नक्की फायदा घ्या.
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक लिमिटेडमध्ये भरती प्रक्रिया 10 सप्टेंबर 2022 पासून सुरु झाली. तर यासाठी 24 सप्टेंबर 2022 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहे. यासाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटवर अर्ज करावा लागेल. उमेदवार ippbonline.com येथे अर्ज दाखल करु शकतात.
रिक्त पदांचा तपशील
या भरत अंतर्गत एकूण 650 पदांवर भरती करण्यात येणार आहे.
वयोमर्यादा
- मॅनेजर : या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे किमान वय 23 वर्ष तर कमाल वय 35 वर्ष असावे.
- सीनियर मॅनेजर : या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे किमान वय 26 वर्ष तर कमाल वय 35 वर्ष असावे.
- चीफ मॅनेजर : या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे किमान वय 29 वर्ष तर कमाल वय 45 वर्ष असावे.
- असिस्टेंट जनरल मॅनेजर : या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे किमान वय 32 वर्ष तर कमाल वय 45 वर्ष असावे.
- डेप्युटी जनरल मॅनेजर : या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे किमान वय 23 वर्ष तर कमाल वय 55 वर्ष असावे.
अशी असेल निवड प्रक्रिया
इंडियन पोस्ट पेमेंट बँकेमार्फत या पदांच्या भरतीसाछी ऑनलाइन परीक्षा घेतली जाईल. ऑनलाइन परीक्षेनंतर त्या उमेदवारांसाठी मंडळनिहाय गुणवत्ता यादी तयार केली जाईल. गुणवत्ता यादीत समाविष्ट असलेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलावले जाईल. कागदपत्र पडताळणीमध्ये यशस्वी झालेल्या उमेदवारांचीच या पदासाठी निवड केली जाईल.
अर्ज शुल्क
या भरती प्रक्रियेत अर्ज करणार्या उमेदवारांना अर्जाचे शुल्क ऑनलाइन भरावे लागणार आहे. SC, ST, PWD अर्जदारांना 150 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. तर इतर सर्वांसाठी 750 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल.
अर्ज कसा करायचा, जाणून घ्या
- इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक लिमिटेडच्या ippbonline.com या अधिकृत वेबसाइटवर जा.
- अर्जासाठीच्या पर्यायावर क्लिक करा.
- आता अर्जामध्ये अचूक माहिती आणि संपूर्ण तपशील भरा.
- त्यानंतर उमेदवारांनी अर्ज शुल्क भरून तो जमा करावा.
- आवेदन शुल्क भरा.
- भविष्यातील संदर्भासाठी फॉर्मची प्रिंट आउट घ्या.
महत्त्वाच्या इतर बातम्या