CPCB Jobs 2022 : केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानं भरती अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार CPCB मध्ये अनेक पदांची भरती केली जाणार आहे. यामध्ये वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, कायदा अधिकारी, वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक आणि खाजगी सचिव या पदांचा समावेश आहे. या भरतीसाठी उमेदवार 31 ऑक्टोबर 2022 पर्यंत अर्ज करू शकतात.


CPCB नोकऱ्या 2022 : रिक्त जागांचा तपशील 


केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानं जाहीर केलेल्या भरती मोहिमेद्वारे एकूण 14 पदांची भरती केली जाणार आहे. ज्यामध्ये वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी पदाच्या 1 पद, कायदा अधिकारी रिक्त जागेसाठी 1 पद, वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यकाची 5 पदं आणि खाजगी सचिवाच्या 7 पदांचा समावेश आहे.


आवश्यक पात्रता


उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून कायद्यातील बॅचलर पदवी पूर्ण केलेली असावी. 


CPCB नोकऱ्या 2022 : वयोमर्यादा


या पदांसाठी प्रतिनियुक्तीवर उमेदवारांची निवड केली जाईल. उमेदवारांचे वय 56 वर्षांपेक्षा जास्त नसावे.


वेतनश्रेणी 



  • वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी : 78,800 रुपये - 2,09,200 रुपये 

  • कायदा अधिकारी : 67,700 रुपये - 2,08,700 रुपये 

  • वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक : 35,400 रुपये - 1,12,400 रुपये 

  • खाजगी सचिव : 44,900 रुपये - 1,42,400 रुपये 


कशी होणार निवड?


अर्ज केलेल्या उमेदवाराची निवड मुलाखतीच्या आधारे केली जाईल.


अर्ज कसा कराल? 


या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज भरावा. 17 ऑक्टोबरपर्यंत प्रशासकीय अधिकारी (भरती), केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, परिवेश भवन, पूर्व अर्जुन नगर, शाहदरा, दिल्ली-110032 येथे अर्ज पाठवू शकतात. त्याच वेळी, आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मिझोराम, नागालँड, त्रिपुरा, सिक्कीम, लडाख, हिमाचल प्रदेश, अंदमान आणि निकोबार इत्यादी ठिकाणी राहणाऱ्या अर्जदारांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 ऑक्टोबर 2022 ठरवण्यात आली आहे.


अनेक तरुण सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात. अनेकदा वेळीच माहिती न मिळाल्यामुळे नोकरीची संधी हातातून जाते. त्यामुळेच नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण-तरुणींसाठी एबीपी माझा खाजगी आणि सरकारी क्षेत्रातील नोकरीसंबंधातील माहिती जॉब माझा या विशेष कॅटेगरीमध्ये दररोज प्रकाशिक करतं. वेगवेगळ्या कंपन्या, संस्थांतील नोकर भरतीबाबत जाणून घेण्यासाठी एबीपी माझाच्या वेबसाईटला नक्की भेट द्या.