IBPS Clerk XII Recruitment 2022 : बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी. इन्स्टिट्यूट ऑफ पर्सनल बँकिंग (IBPS) नं लिपिक पदासाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी 1 जुलैपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जुलै आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट ibps.in वर जाऊन या पदांसाठी अर्ज करू शकतात.
कोणत्या बँकेत भरती?
अधिसूचनेनुसार, या प्रक्रियेद्वारे, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, यूको बँक, युनियन बँक ऑफ इंडिया आणि पंजाब नॅशनल बँक लिपिक पदांच्या 6035 पदांची भरती केली जाणार आहे.
आवश्यक पात्रता
पूर्वीच्या अधिसूचनेच्या आधारे, असं म्हणता येईल की, कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून पदवी प्राप्त केलेल्या उमेदवारांनी अर्ज करावा. वयोमर्यादेबद्दल बोलायचं झालं तर किमान 20 वर्ष आणि कमाल 28 वर्ष असावी.
परीक्षा कधी होणार?
IBPS लिपिक भरतीची प्राथमिक परीक्षा 2022 अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आयोजित केली जाईल. IBPS परीक्षा कॅलेंडर 2022 नुसार, लिपिक भरती परीक्षा 28 ऑगस्ट, 3 आणि 4 सप्टेंबर 2022 रोजी घेतली जाईल. IBPS लिपिक भरती पूर्व परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी बोलावलं जाईल. मुख्य परीक्षा ऑक्टोबर 2022 मध्ये घेतली जाईल.
कसा असेल परीक्षा पॅटर्न?
या पदांच्या भरतीसाठी उमेदवारांची निवड प्राथमिक परीक्षा आणि मुख्य परीक्षेच्या आधारे केली जाईल. प्राथमिक परीक्षेत, उमेदवारांना इंग्रजी, संख्यात्मक क्षमता आणि तर्क क्षमता या विषयांतून 100 गुणांचे 100 प्रश्न विचारले जातील. हे प्रश्न सोडवण्यासाठी 60 मिनिटांचा अवधी दिला जाईल. तसेच, मुख्य परीक्षेत 200 गुणांचे 190 प्रश्न असतील आणि त्यासाठी 160 मिनिटं दिली जातील.
अर्ज शुल्क
या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 850 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. तसेच, SC/ST प्रवर्गातील उमेदवारांना 175 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. अधिक माहितीसाठी उमेदवार अधिकृत वेबसाईटवर तपासू शकतात.
अनेक तरुण सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात. अनेकदा वेळीच माहिती न मिळाल्यामुळे नोकरीची संधी हातातून जाते. त्यामुळेच नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण-तरुणींसाठी एबीपी माझा खाजगी आणि सरकारी क्षेत्रातील नोकरीसंबंधातील माहिती जॉब माझा या विशेष कॅटेगरीमध्ये दररोज प्रकाशिक करतं. वेगवेगळ्या कंपन्या, संस्थांतील नोकर भरतीबाबत जाणून घेण्यासाठी एबीपी माझाच्या वेबसाईटला नक्की भेट द्या.
महत्त्वाच्या इतर बातम्या :