CSIR CLRI Recruitment 2022 : तुम्ही नोकरीच्या शोधात असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरू शकते. सेंट्रल लेदर रिसर्च इन्स्टिट्यूट (CLRI) चेन्नईनं विविध विभागांमध्ये रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार या भरतीसाठी 20 जून 2022 पर्यंत अर्ज करू शकतात. यासाठी इच्छुक उमेदवाराला technician.clri.org या अधिकृत साइटला भेट द्यावी लागेल. या भरतीअंतर्गत तंत्रज्ञांच्या 55 ​​पदांची भरती केली जाणार आहे.


भरती प्रक्रियेतील रिक्त जागांचा तपशील


या भरती मोहिमेद्वारे लेदर गुड्स मेकरची 01 जागा, फिनिशड लेदर मेकरची 06 पदं, प्रयोगशाळा सहाय्यक 06 पदं, फुटवेअर मेकरची 06 पदं, शिवण तंत्रज्ञानाची 01 जागा, टूल मेकॅनिकची 03 पदं, फिटरची 04 पदं, मशिनिस्टची 01 जागा. कोपाची 03 पदं, डेटाबेस सिस्टम असिस्टंट 03 पदं, इलेक्ट्रिशियन 05 पदं, प्लंबर 02 पदं, ड्राफ्ट्समन 01 पद, मेसन 01 पद, सुतार 03 पदं, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक 02 आणि डिजिटल फोटोग्राफी 01 पद या पदांवर भरती केली जाणार आहे. 


भरतीसाठी अत्यावश्यक शैक्षणिक पात्रता


या भरतीअंतर्गत लेदर गुड्स मेकरच्या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार 10वी पास असावा. तसेच, अर्जदाराकडे लेदर गुड्स मेकरमध्ये आयटीआय प्रमाणपत्र किंवा लेदर गुड्स मेकरमध्ये राष्ट्रीय/राज्य व्यापार प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. या भरतीद्वारे अनेक पदांची भरती करायची असून, त्यासाठी शैक्षणिक पात्रताही स्वतंत्रपणे मागविण्यात आली आहे. 


असा करा अर्ज 


या भरतीसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार 20 जून 2022 पर्यंत अर्ज करू शकतात. यासाठी, त्यांना CSIR-CLRI च्या अधिकृत वेबसाइट https://clri.org वर उपलब्ध असलेल्या लिंकवर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल.


अनेक तरुण सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात. अनेकदा वेळीच माहिती न मिळाल्यामुळे नोकरीची संधी हातातून जाते. त्यामुळेच नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण-तरुणींसाठी एबीपी माझा खाजगी आणि सरकारी क्षेत्रातील नोकरीसंबंधातील माहिती जॉब माझा या विशेष कॅटेगरीमध्ये दररोज प्रकाशिक करतं. वेगवेगळ्या कंपन्या, संस्थांतील नोकर भरतीबाबत जाणून घेण्यासाठी एबीपी माझाच्या वेबसाईटला नक्की भेट द्या.  


महत्त्वाच्या इतर बातम्या :