BRO Recruitment 2022 : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (BRO) ने स्टोअर कीपर टेक्निकल (SKT) आणि मल्टी स्किल्ड वर्कर (MSW) पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. या पदांसाठी अर्ज करणारे उमेदवार अधिकृत वेबसाइट bro.gov.in वर जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेवर अर्ज करू शकतात. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनमधील या पदांसाठी केवळ पुरुष उमेदवारच अर्ज करू शकतात. ही भरती सामान्य राखीव अभियंता दलासाठी केली जाणार आहे. 


भरती प्रक्रियेतील महत्त्वाच्या तारखा 


बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनने जारी केलेल्या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 जुलै 2022


भरती प्रक्रियेसंदर्भातील महत्त्वाची माहिती 


अधिकृत माहितीनुसार, या भरती प्रक्रियेतून बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनमध्ये स्टोअर कीपर टेक्निकलची 377 पदं आणि मल्टी स्किल्ड कामगारांच्या 499 रिक्त पदांची भरती कण्यात येणार आहे. यामध्ये 321 पदं अनारक्षित प्रवर्गासाठी, 143 पदं अनुसूचित जाती प्रवर्गासाठी, 76 पदं अनुसूचित जमातीसाठी, 280 पदं इतर मागास प्रवर्गासाठी आणि 56 पदं आर्थिक दुर्बल घटकांसाठी आहेत.


भरती प्रक्रियेसाठी वयोमर्यादा 


मल्टी स्किल्ड कामगार पदांसाठी उमेदवाराचं वय 18 ते 25 वर्ष आणि स्टोअर कीपर तांत्रिक पदांसाठी 18 वर्ष ते 27 वर्ष असावं. शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि इतर तपशीलवार माहिती मिळविण्यासाठी, उमेदवार अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अधिकृत अधिसूचना तपासू शकतात.


निवड प्रक्रिया कशी होणार? 


या पदांच्या भरतीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी, दस्तऐवज पडताळणी आणि वैद्यकीय चाचणीच्या आधारे केली जाईल. उमेदवार BRO SKT Recruitment 2022 साठी विहित नमुन्यात अर्ज करू शकतील.  


अनेक तरुण सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात. अनेकदा वेळीच माहिती न मिळाल्यामुळे नोकरीची संधी हातातून जाते. त्यामुळेच नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण-तरुणींसाठी एबीपी माझा खाजगी आणि सरकारी क्षेत्रातील नोकरीसंबंधातील माहिती जॉब माझा या विशेष कॅटेगरीमध्ये दररोज प्रकाशिक करतं. वेगवेगळ्या कंपन्या, संस्थांतील नोकर भरतीबाबत जाणून घेण्यासाठी एबीपी माझाच्या वेबसाईटला नक्की भेट द्या.  


महत्त्वाच्या इतर बातम्या :