Farmer Protest : केंद्र सरकारने केलेले कृषी कायदे रद्द करावे, या मागणीसाठी तब्बल वर्षभर शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सिमेवर आंदोलन केले होते. केंद्र सरकारने कायदे रद्द केल्यानंतरच शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले होते. मात्र, सरकारने त्यावेळी शेतकऱ्यांच्या अन्य मागण्या मान्य करण्याचे आश्वासन देखील शेतकऱ्यांना दिले होते. मात्र, अद्याप शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत. त्यामुळे संयुक्त किसान मोर्चाने पुन्हा एकदा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्या आंदोलनाची तयारी सुरू असल्याचेही बोलले जात आहे. याबाबत लवकरच संयुक्त किसान मोर्चाची बैठक देखील होणार आहे.


पंजाब विधानसभा निवडणुकीच्या मतदानानंतर पुन्हा एकदा शेतकरी त्यांच्या अन्य मागण्यांसाठी आक्रमक झाले आहेत. हमीभावासह उर्वरित मागण्यांसाठी शेतकरी संघटनांनी पुन्हा आंदोलन सुरू करण्याची तयारी केली आहे. 10 मार्चनंतर शेतकरी संघटना दिल्लीतील रामलीला मैदानावर आंदोलन करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पंजाबमधील मतदान प्रक्रिया पार पडली आहे. या मतदानाचा 10 मार्चला निकाल लागणार आहे. त्यानंतर संयुक्त किसान मोर्चाचा आंदोलन करणार असल्याची चर्चा सुरू आहे.


दरम्यान, पंजाबच्या विधानसभा निवडणुकीत ज्या शेतकरी संघटना सामील झाल्या आहेत, त्या देखील या आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती मिळत आहे. आंदोलन पुन्हा सुरू करण्यासाठी निवडणूक लढवणाऱ्या संघटनांनाही बैठकीसाठी बोलावण्यात येणार आहे. दरम्याान, याबाबत किसान सभेचे अध्यक्ष सतनाम सिंह म्हणाले की, शेतकऱ्यांच्या अनेक मागण्या अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत. आमच्या उर्वरित मागण्यांमध्ये हमीभावाचा कायदा, आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांवर नोंदवलेले पंचनामे, लखीमपूर खीरी प्रकरणात मंत्र्यांच्या मुलाची अटक, 700 हून अधिक शेतकऱ्यांच्या मृत्यूची भरपाई यांचा समावेश आहे. आमच्या या सर्व मागण्या पूर्ण कराव्यात असे त्यांनी सांगितले आहे.


दरम्यान, सध्या देशात पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकांचा रणसंग्राम सुरू आहे. पंजाब, गोवा आणि उत्तराखंडमध्ये मतदान प्रक्रिया पार पडसी आहे. तर उत्तर प्रदेशमध्ये मतदानाचे चार टप्पे झाले आहेत. तर मणिपूरमध्ये आणखी मतदान प्रक्रिया झालेली नाही. अशातच आता संयुक्त किसान मोर्चाचे नेते पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे. केंद्र सरकारने केलेले कृषी कायदे रद्द करावे, या मागणीसाठी तब्बल वर्षभर शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सिमेवर आंदोलन केले होते. केंद्र सरकारने कायदे केल्यानंतरच शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले होते. त्यावेळी सरकारने शेतकऱ्यांच्या अन्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन देखील सरकारने शेतकऱ्यांना दिले होते. मात्र, अद्याप त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, त्यामुळे पुन्हा एकदा संयुक्क किसान मोर्चाचे नेते आक्रमक झाले आहेत.


महत्त्वाच्या बातम्या: