मुंबई : सध्या सरकारी नोकरदाराला चांगलंच डिमांड आलं आहे, त्यामुळे सरकारी नोकरीसाठी लाखो विद्यार्थी आपलं नशिब आजमवाताना दिसून येतात. कुणाला लग्नासाठी, कुणाला करिअरसाठी, कुणाला आई-वडिलांच्या स्वप्नपूर्तीसाठी तर कुणाला लोकांची सेवा करण्यासाठी सरकारी नोकरी पाहिजे, असते. त्यासाठी, सातत्याने अर्ज करुन उमेदवार नशिब आजमवतात. आता, बृहन्मुंबई महानगरपालिकेत तब्बल ‘कार्यकारी सहायक’ (पूर्वीचे पदनाम: लिपिक) या संवर्गातील 1 हजार 846 जागा सरळसेवेने भरण्यासाठी प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या जागांसाठी पात्रताधारक उमेदवारांकडून दिनांक 20 ऑगस्ट 2024 पासून ऑनलाईन अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. 9 सप्टेंबर 2024 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत अर्ज करण्याची अंतिम तारीख आणि वेळ असणार आहे. त्यासाठी शैक्षणिक अर्हता नेमकी काय, कोणाला अर्ज करता येणार आणि किती अर्जसोबत किती फी भरावी लागणार याची माहिती आपण यात पाहणार आहोत.


सरकारी नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांना बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरील https://www.mcgm.gov.in/irj/portal/anonymous/qlrn या लिंकवर या भरतीबाबत सविस्तर जाहिरात देण्यात आली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ.अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली या भरतीची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. 


बृहन्मुंबई महानगरपालिकेतील विविध खात्यांच्या आस्थापनेवरील गट ‘क’ मधील रु. 25,500-81100 (पे मॅट्रिक्स-एम 15) अधिक अनुज्ञेय भत्ते या सुधारित वेतनश्रेणीतील ‘कार्यकारी सहायक’ (पूर्वीचे पदनाम: लिपिक) या संवर्गातील 1 हजार 846 रिक्त पदे सरळसेवेने भरण्यात येणार आहेत. यामध्ये अनुसूचित जाती (142), अनुसूचित जमाती (150), विमुक्त जाती-अ (49), भटक्या जमाती-ब (54), भटक्या जमाती-क (39), भटक्या जमाती-ड (38), विशेष मागास प्रवर्ग (46), इतर मागासवर्ग (452), आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (185), सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग (185), खुला प्रवर्ग (506) याप्रमाणे रिक्त पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाईल. तसेच या पदांचे समांतर आरक्षणानुसार वर्गीकरण करण्यात आले असून त्याची सविस्तर माहिती जाहिरातीमध्ये समाविष्ट आहे.


कार्यकारी सहायक (पूर्वीचे पटनाः लिपिक) या पदाची शैक्षणिक अर्हता 


1) उमेदवार मान्यताप्राप्त मंडळाची माध्यममिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम परीक्षा प्रथम
प्रयत्नात उत्तीर्ण असायला हवा.


(2) उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य, विज्ञान, कला, विधी किंवा तत्सम शाखांचा पदवीधर असावा आणि प्रथम प्रयत्नात किमान 45% गुणांसह उत्तीर्ण असावा.


(3) ज्या मान्यताप्राप्त विद्यापिठाची सत्र पद्धत अवलंबली जात असेल त्या विद्यापीठातील उमेदवाराची टक्केवारी खालीलप्रमाणे गणण्यात येईल. सदर टक्केवारी 45% गुणांसह प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.


Point Grading System (CB GS) प्रमाणे श्रेणी देण्यात येणाऱ्या विद्यापीठातील उमेदवाराच्या सर्व विषयांच्या गुणांची एकत्रित टक्केवारी गणण्यात येईल.


10 Point Grading System (CB CS) प्रमाणे श्रेणी देण्यात येणाऱ्या विद्यापीठातील उमेदवारीची टक्केवारी पुढील सुत्राप्रमाणे गणण्यात येईल,


टक्केवारी (%) = 7.1X CGPA (Cultive Grade Point Avergage) + 11. 


टक्केवारीची गणना वरील सूत्र वापरून अपूर्णांकात आल्यास पुढील पूर्णांकात गणण्यात येईल. 


(4) उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र वा तत्सम किंवा उच्च परीक्षा 100 गुणांचे मराठी व 100 गुणांचे
इंग्रजी विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असावा, 


(5) उमेदवाराकडे शासनाने इंग्रजी व मराठी टंकलेखनाने प्रत्येकी किमान 30 शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असावे. 


(6) उमेदवाराकडे संगणक माहिती तंत्रज्ञान विषयक परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र (MSCIT) असणे आवश्यक आहे. महाराष्ट्र शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान संचालकाने यासंदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या व
बृहन्मुंबई महानगरपालिकेने अंमलात आणलेल्या परिपत्रकातील तरतुदी लागू होतील. 


वयोमर्यादा


खुला प्रवर्ग  -  खुल्या प्रवर्गासाठी वयाची मर्यादा 18 ते 38 वर्षे
मागास प्रवर्ग - मागास प्रवर्गासाठी वयोमर्यादा 18 ते 43 वर्षे


अर्ज करताना ऑनलाईन शुल्क


खुल्या प्रवर्गासाठी - 1000 रुपये (वस्तू व सेवा करासह)
मागास प्रवर्गासाठी - 900 रुपये (वस्तू व सेवा करासह)


उमेदवाराने अर्ज भरल्याने हे परीक्षा शुल्क कोणत्याही परिस्थितीत उमेदवारांना परत दिले जाणार नाही.


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI