Bank of India SO Recruitment 2022 : बँकेत नोकरीची इच्छा असणाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. बँक ऑफ इंडियामध्ये (BOI) नोकरीची संधी आली आहे. या भरती अंतर्गत 594 पदांवर भरती करण्यात येणार आहे. ही भरती प्रक्रिया 26 एप्रिल रोजी सुरु झाली असून यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 मे 2022 आहे. इच्छुक उमेदवार बँक ऑफ इंडियाच्या www.bankofindia.co.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करु शकतात.
महत्त्वाच्या तारखा
अर्ज प्रक्रिया सुरु झाल्याची तारीख : 26 एप्रिल 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 मे 2022
अर्जाचे शुल्क भरण्याची तारीख : 10 मे 2022
एकुण 594 रिक्त पदांवर भरती
अर्थतज्ज्ञ (Economist) : 02
सांख्यिकीशास्त्रज्ञ (Statistician) : 02
जोखीम व्यवस्थापक (Risk Manager) : 02
क्रेडिट विश्लेषक (Credit Analyst) : 53
क्रेडिट अधिकारी (Credit Officers) :484
टेक मूल्यांकन (Tech Appraisal) : 09
आयटी अधिकारी - डेटा सेंटर (IT Officer - Data Centre) : 42
वयोमर्यादा
या भरतीअंतर्गत अर्थतज्ज्ञ (Economist), सांख्यिकीशास्त्रज्ञ (Statistician), जोखीम व्यवस्थापक (Risk Manager), टेक मूल्यांकन (Tech Appraisal) या पदांसाठी इच्छुक उमेदवाराचे वय 25 ते 35 वर्षापर्यंत असावे. क्रेडिट अधिकारी (Credit Officers) आणि आयटी अधिकारी - डेटा सेंटर (IT Officer - Data Centre) पदांसाठी इच्छुक उमेदवाराचे वय 20 ते 30 वर्षापर्यंत असावे. तसेच क्रेडिट विश्लेषक (Credit Analyst) पदांच्या भरतीसाठी इच्छुक उमेदवाराचे किमान वय 30 आणि कमाल वय 38 वर्षे असावे.
शैक्षणिक पात्रता
या भरतीअंतर्गत विविध पदांसाठी वेगवगळी शैक्षणिक पात्रता आहे उमेदवार खाली दिलेल्या लिंकवर याबाबत अधिक माहिती मिळवू शकतात.
शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
अनुभव
या पदांवरील भरतीसाठी उमेदवारांना खालीलप्रमाणे अनुभव असणे गरजेचं आहे.
- क्रेडिट अधिकारी : अनुभव आवश्यक नाही
- अर्थशास्त्रज्ञ : किमान 4 वर्षे
- सांख्यिकीतज्ज्ञ : किमान 4 वर्षे
- जोखीम व्यवस्थापक : किमान 3 वर्षे
- क्रेडिट विश्लेषक : किमान 10 वर्षे.
- त्रिक मूल्यमापन : किमान 3 वर्षे
- आयटी अधिकारी : किमान 2 वर्षे
- व्यवस्थापक : किमान 7 वर्षे
- वरिष्ठ व्यवस्थापक : किमान 8 वर्षे
अर्ज शुल्क
या भरती अंतर्गत अर्ज करणाऱ्या उमेदवाराला 850 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. ST/SC उमेदवारांना अर्जाच्या शुल्कात सवलत देण्यात आली असून त्यांना केवळ 175 रुपये शुल्क भरावे लागेल.
महत्त्वाच्या इतर बातम्या :