PNB SO Recruitment 2022 : बँकेत नोकरी करण्यासाठी इच्छुक उमेदवारांसाठी मोठी संधी आहे. पंजाब नॅशनल बँकेत (PNB Bank) नोकरी करण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे. पंजाब नॅशनल बँकेत विषेष अधिकारी म्हणजेच स्पेशलिस्ट ऑफिसर (SO) पदावर भरतीसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. या भरती अंतर्गत एकूण 145 पदांवर भरती करण्यात येणार आहे. या भरतीची प्रक्रिया 20 एप्रिलपासून सुरु करण्यात आली होती. याभरतीअंतर्गत अर्ज करण्यासाठी 7 मे म्हणजे आज शेवटची तारीख आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी आजच अर्ज करा. 


या भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना पंजाब नॅशनल बँकेच्या (PNB Bank) pnbindia.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल. अर्ज भरताना चूक झाल्यास तुमचा अर्ज नाकारला जाऊ शकतो. त्यामुळे अर्ज काळजीपूर्वक भरा.


महत्त्वाच्य तारखा
अर्जाची प्रक्र‍िया सुरु झाल्याची तारीख : 22 एप्रिल 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 07 मे 2022
परीक्षेची तारीख (PNB SO Exam Date) : 12 जून 2022


PNB SO भर्ती 2022 साठी अर्ज कसा करावा:
1. PNB च्या अधिकृत वेबसाइट www.pnbindia.in ला भेट द्या
2. तेथे दिलेल्या करिअर (Recruitment/Careers) पर्याय निवडा.
3. तेथे दिलेल्या लिंकवर क्लिक करा नवीन नोंदणीसाठी (Registration) येथे क्लिक करा. उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी नोंदणी (Registration) करणे आवश्यक आहे.
4. यासह तुमचा नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड तयार होईल.
5. या नोंदणी क्रमांक आणि पासवर्डसह पुन्हा लॉगिन करा.
6. लॉगिन केल्यानंतर काळजीपूर्वक अर्ज भरा


शैक्षिक पात्रता
या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी पदवी किंवा पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेली असावी. 


वयोमर्यादा
या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवाराचे किमान वय 25 वर्ष तर कमाल वय 35 वर्ष असावे. उमेदवाराचे वय 35 वर्षापेक्षा अधिक वय असू नये. आरक्षित वर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट मिळेल.


अशी असेल निवड प्रक्रिया
या भरतीसाठी उमेदवारांची निवड करण्यासाठी 12 जून रोजी परीक्षा घेण्यात येईल. या भरती अंतर्गत मॅनेजर पदांवर 40 मॅनेजर (Risk), 100 मॅनेजर (Credit), वरिष्ठ व्यवस्थापक म्हणजेच 5 सिनिअर मॅनेजर (Treasury) पदांवर भरती करण्यात येणार आहे.


पगार किती असेल?


लेखी परीक्षेच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल. गुणवत्ता यादीतीलच्या आधारे मुलाखत घेतली जाईल. त्यानंतर अंतिम यादी जाहीर केली जाईल. मॅनेजर (Risk) आणि मॅनेजर (Credit) निवडलेल्या उमेदवारांना पात्रतेप्रमाणे 48170 ते 69810 रुपये, तर वरिष्ठ व्यवस्थापकाला (Treasury) 63840 ते 78230 रुपये पगार दिला जाईल.


अर्ज शुल्क 
उमेदवारांना अर्ज फी म्हणून 850 रुपये भरावे लागतील. SC/ST/PWBD श्रेणीतील उमेदवारांना अर्जाच्या शुल्काल सूट देण्यात आली असून केवळ 50 रुपये शुल्क भरावं लागेल.


महत्त्वाच्या इतर बातम्या :