Bank of Baroda Jobs 2024 : तुम्ही बँकेत नोकरीच्या शोधात (Job Vacancy) असाल तर, तुमच्यासाठी नामी संधी चालून आली आहे. बँक ऑफ बडोदामध्ये बंपर भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत विविध पदांवर भरती करण्यात येईल. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज दाखल करावा. इच्छुक आणि पात्र उमेदवार bankofbaroda.in या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज दाखल करु शकतात.
बँक ऑफ बडोदामध्ये 627 पदांवर भरती
बँक ऑफ बडोदामध्ये वेगवेगळ्या पदांवर भरती करण्यात येत आहे. यासाठीची अर्ज प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. या भरती मोहिमेअंतर्गत एकूण 627 पदांवर भरती करण्यात येणार आहे. या भरतीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया 12 जून 2024 पासून सुरु झाली आहे. या भरतीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटची तारीख 2 जुलै 2024 आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी शेवटच्या तारखेची वाट न पाहता वेळीच अर्ज दाखल करावा.
Bank of Baroda Jobs 2024 : भरतीसंबंधित महत्त्वाच्या तारखा
- अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख : 12 जून 2024
- अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख : 2 जुलै 2024
Bank of Baroda Jobs 2024 : आवश्यक शैक्षणिक पात्रता
या भरती मोहिमेसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवार मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीधर असणे आवश्यक आहे. पात्रतेशी संबंधित अधिक तपशीलांसाठी, उमेदवार अधिकृत अधिसूचना पाहू शकतात.
Bank of Baroda Jobs 2024 : वयोमर्यादा
या भरती मोहिमेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 24 ते 45 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे. तर, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमांनुसार सूट दिली जाईल.
Bank of Baroda Jobs 2024 : अर्जाची फी किती भरावी लागेल?
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना फी भरावी लागेल. अर्ज करणाऱ्या OBC आणि EWS प्रवर्गातील उमेदवारांना 600 रुपये शुल्क भरावे लागेल. तर SC, ST, PWD आणि महिला उमेदवारांना 100 रुपये शुल्क भरावे लागेल. भरतीसंदर्भातील अधिक माहितीसाठी उमेदवार अधिकृत अधिसूचना पाहू शकतात.
Bank of Baroda Jobs 2024 : अर्ज दाखल करण्यासाठी खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करा.
- स्टेप 1 : बँक ऑफ बडोदामध्ये भरतीसाठी अर्ज करण्यासाठी सर्वात आधी bankofbaroda.in या वेबसाईटवर जा.
- स्टेप 2 : आता भरतीसाठीच्या लिंकवर क्लिक करा.
- स्टेप 3 : यानंतर उमेदवारासंबंधित सर्व माहिती भरा.
- स्टेप 4 : यानंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- स्टेप 5 : अर्ज शुल्क भरा.
- स्टेप 6 : अर्ज सबमिट करा.
- स्टेप 7 : अर्ज डाऊनलोड करून प्रिंट काढा.