Private Job Vacancy : ई-कॉमर्स वेबसाइट अॅमेझॉननं (Amazon) गुरुग्राम आणि नोएडामध्ये आयटी सपोर्ट इंजिनिअर पदांसाठी जागा जाहीर केल्या आहेत. ज्यांना आयटी क्षेत्रात किमान दोन वर्षांचा कामाचा अनुभव आहे, ते यासाठी अर्ज करू शकतात. Amazon ला IT RAD (रॅपिड अॅसेट डिप्लॉयमेंट), RMA (रिटर्न मर्चेंडाईज ऑथोरायझेशन) केंद्र व्यवस्थापित करण्यासाठी, Amazon ची IT पायाभूत सुविधा राखण्यासाठी आणि भारतातील सर्व भागीदार OEM (Original Equipment Manufacturer) यांना RMA समर्थन देण्यासाठी IT सपोर्ट इंजिनियर्सची आवश्यकता आहे. 


योग्यता : संगणक विज्ञान किंवा समतुल्य आयटी क्षेत्रातील पदवीधर आणि Cisco CCNA आणि CCNP प्रमाणपत्र असलेले उमेदवार या पदासाठी पात्र आहेत.


कौशल्य 



  • A+ प्रमाणित किंवा समतुल्य Microsoft MCSE, MCITP Systems Administrator चा अनुभव

  • ट्रबलशूटिंग, रेडियो स्कॅनर, पर्सनल कम्प्युटर इत्यादिंना दुरुस्त करण्याची माहिती 

  • आयटी संबंधित उपकरणांसाठी RMA प्रक्रेयेची माहिती 

  • IOS इमेजिंग, लायनक्स, विंडोज ऑपरेटिंग सिस्टमचा अनुभव

  • डीएनएस, डीएचसीपी, ओएसआई मॉडल, टीसीपी/आयपी प्रोटोकॉलची माहिती 

  • नेटवर्क इंजीनियरिंग, सिस्को कॉन्फिगुरेशन अँड मॅनेजमेंट, मायक्रोसॉफ्ट विंडोज अॅडमिनिस्ट्रेशन, लायनक्स सर्व्हर अॅड्मिनिस्ट्रेशनमध्ये किमान एकात प्रवीणताजॉब लोकेशन : गुरुग्राम, हरियाणा


जॉब आयडी : A2083458


जॉब लोकेशन : नोएडा, उत्तर प्रदेश


जॉब आयडी : A2113306


कसा कराल अर्ज? 


या पदांसाठी अर्ज करण्यासाठी, तुम्ही Amazon Jobs ची अधिकृत वेबसाईट किंवा LinkedIn वर Amazon च्या पेजला भेट देऊन अर्ज करू शकता. 


अनेक तरुण सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात. अनेकदा वेळीच माहिती न मिळाल्यामुळे नोकरीची संधी हातातून जाते. त्यामुळेच नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण-तरुणींसाठी एबीपी माझा खाजगी आणि सरकारी क्षेत्रातील नोकरीसंबंधातील माहिती जॉब माझा या विशेष कॅटेगरीमध्ये दररोज प्रकाशिक करतं. वेगवेगळ्या कंपन्या, संस्थांतील नोकर भरतीबाबत जाणून घेण्यासाठी एबीपी माझाच्या वेबसाईटला नक्की भेट द्या.  


महत्त्वाच्या इतर बातम्या :