त्या तिघींची गगन भरारी
सध्या वायूदलात 1300 महिला अधिकारी असून, त्यातील 94 महिला या वैमानिक आहेत. मात्र, त्या केवळ ट्रान्सपोर्ट विमान, हेलिकॅप्टर आदींवरच काम करत आल्या आहेत. युद्ध क्षेत्रावर आजपर्यंत कोणीही प्रतिनिधित्व केले नाही.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआवनी या मध्यप्रदेशमधील साटण्याच्या रहिवासी असून त्यांचा एक भाऊदेखील सैन्य दलात कार्यरत आहे. तर गुजरातमधील बडोदाच्या मोहना सिंह यांचे वडील वायू दलात सार्जंट होते. तर मथूरेच्या भावना कंठ यांच्या कुटुंबातील कोणीही भारतीय सैन्यदलात कार्यरत नव्हते.
पासिंग आउट परेडनंतर त्यांना कर्नाटकमधील बिदर येथे असलेल्या एअरबेसवर अधिकचे ट्रेनिंग पूर्ण करावे लागणार आहे. त्यानंतर त्या सुखोई, मिरास, जुगवारसारख्या अत्याधुनिक विमानाचे प्रतिनिधित्व करू शकणार आहेत.
या तिघींनीही पिलेटस या विमानावरील सुरुवातीचे आपले सहा महिन्यांचे प्रशिक्षण हैदराबादच्या एअरफोर्स ट्रेनिंग सेंटरवर पूर्ण केले. त्यानंतर उर्वरित सहा महिन्याचे प्रशिक्षण हकिमनेट एअरबेसवरील किरण एअरक्राफ्टवर केले.
या तिघीही आधीपासूनच वायूदलात आधिकारी आहेत. पण आता त्या फायटर पायलट झाल्याने त्यांना युद्धादरम्यान वापरण्यात येणाऱ्या सुखोई, मिराजसारख्या विमानांचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे.
देशाच्या वायूसेनेच्या इतिहासात तीन तरुणींनी आपले नाव सुवर्ण अक्षरांनी नोंदवून वायूदलात फायटर पायलट म्हणून रुजू झाल्या. अवनी चर्तुवेदी, भावना कंठ आणि मोहनी सिंह यांनी हैदरबादच्या पासिंग आउट परेडमध्ये आपले कसब दाखवले.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -