नवी दिल्ली : दिल्लीतील निर्भया प्रकरणातील चारही दोषींना येत्या 22 जानेवारीला फासावर लटकवलं जाणार आहे. देशातील गेल्या तीन दशकातील फाशीच्या शिक्षेवर नजर टाकल्यात 1991 पासून आतापर्यंत 16 कैद्यांना फाशी देण्यात आली आहे. यामध्ये अजमल कसाब, याकून मेमन आणि संसदेवर हल्ला करणाऱ्या अफजल गुरु या दहशतवाद्यांचा समावेश आहे.


मागील 20 वर्षांवर नजर टाकल्यास दोन दशकात केवळ 4 जणांना फाशी देण्यात आली आहे. यामध्ये धनंजय चॅटर्जी या कैद्याचा समावेश आहे. धनंजयने 5 मार्च 1990 मध्ये 14 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या केली होती. धनंजयला 14 ऑगस्ट 2001 रोजी कोलकाताच्या अलीपूर जेलमध्ये फाशी देण्यात आली. धनंजयला फाशी देण्यासाठी 14 वर्षांची वाट पाहावी लागली होती.


मुंबईवरील 26/11 हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाबला 21 नोव्हेंबरला 2012 फासावर लटकवण्यात आलं होतं. पुण्यातील येरवडा जेलमध्ये कसाबला फाशी देण्यात आली होती. मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 साली झालेल्या हल्ल्यात कसाबने अनेक निष्पाप नागरिकांचा बळी घेतला होता. कसाबलाही फाशी देण्यासाठी 4 वर्षांची वाट पाहावी लागली.


अजमल कसाबनंतर संसदेवर हल्ला करणाऱ्या अफजल गुरुच्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी 9 फेब्रुवारी 2013 रोजी करण्यात आली. 13 डिसेंबर 2001 रोजी संसदेवर झालेल्या हल्ल्याचा अफजल गुरु मास्टरमाईंड होता. अफजलला फासावर लटकवण्यासाठी 11 वर्षांचा काळ लोटला गेला. अफजलला तिहार जेलमध्ये फासावर लटकवण्यात आलं होतं.


अफजल गुरुला फासावर लटकल्यानंतर 30 जुलै 2015 रोजी 1993 मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेमनला नागपूरच्या सेंट्रल जेलमध्ये फाशी देण्यात आली. याकूबला फाशीच्या फंद्यापर्यंत नेण्यासाठी तब्बल 22 वर्ष लागली.


अफजल गुरुनंतर निर्भया प्रकरणातील आरोपींना तिहार जेलमध्ये फाशी दिली जाणार आहे. 7 जानेवारी 2020 रोजी चारही आरोपींच्या फाशी वॉरंट जारी करण्यात आलं असून 22 जानेवारील त्यांना फाशी दिली जाणार आहे. देशभरातील जेल प्रशासनाच्या इतिहासात पहिल्यांदाच एकाच वेळी चौघांना फाशी देण्यात येणार आहे.


काय आहे निर्भया गँगरेप प्रकरण?


- सात वर्षांपूर्वी म्हणजेच 16 डिसेंबर 2012 रोजी दिल्लीत 23 वर्षीय पॅरामेडिकल विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार झाला होता.
- सिनेमा पाहून आल्यानंतर मित्रासोबत खासगी बसमधून मुनिरकाहून द्वारकाला जात होती. बसमध्ये त्या दोघांशिवाय सहा जण होते.
- त्यांनी निर्भयासोबत छेडछाड करायला सुरुवात केली. विरोध केल्याने आरोपींनी तिच्या मित्राला एवढी मारहाण केली की तो बेशुद्ध झाला.
- यानंतर एकटीच असलेल्या निर्भयावर सहा नराधमांनी धावत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार केला. एवढंच नाही तर अनन्वित अत्याचार केले.
- तरुणीला गंभीर जखमी केल्यानंतर नराधमांनी दोघांना दक्षिण दिल्लीच्या महिपालपूरजवळच्या वसंत विहार परिसरात धावत्या बसमधूनच रस्त्यावर फेकलं.
- दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु होते. मात्र प्रकृतीत सुधारणा न झाल्याने तिला सिंगापूरच्या माऊंट एलिझाबेथ रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
- मात्र 29 डिसेंबर रोजी उपचारांदरम्यान माऊंट एलिझाबेथ रुग्णालयातच तिने अखेरचा श्वास घेतला.



संबंधित बातम्या