Maniac Yo Yo Honey Singh New Song : देशभरात प्रसिद्ध असलेला रॅपर आणि गायक हनी सिंग नेहमीच चर्चेत असतो. त्याचे आलेले प्रत्येक गाणे देशभरात आवडीने पाहिले आणि ऐकले जाते. हनी सिंगचे 'नेमियाक' हे नवे गाणे काही दिवसांपूर्वीच यूट्यबवर रिलीज करण्यात आले आहे. विशेष म्हणजे त्याच्या प्रत्येक गाण्याप्रमाणे या गाण्यालाही लोकांनी डोक्यावर घेतले आहे. मात्र आता याच गाण्यामुळे तो अडचणीत आला आहे. या गाण्यामुळे त्याच्याविरोधात न्यायलयात याचिका दाखल करण्यात आली आहे.
अभिनेत्रीने थेट कोर्टात खेचलं
हनी सिंगच्या मेनियाक हे गाणे आता वादात सापडले आहे. या गाण्यातील चित्रीकरणाला घेऊन एका अभिनेत्रीने त्याला थेट न्यायालयात खेचले आहे.या अभिनेत्रीचे नाव नितू चंद्रा आहे. तिने पाटणा येथील न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. हनी सिंगने मेनियाक या गाण्यात महिलांचा अश्लील चित्रिकरण केले आहे तसेच या गाण्याच्या माध्यमातून त्याने अश्लीलता पसरवली आहे, असा आरोप नितू चंद्राने केला आहे.
भोजपुरी शब्दांचा वापर करून अश्लीलता पसरवल्याचा आरोप
बुधवारी नितू चिंदाने वकील निवेदिता निर्विकार यांच्या माध्यमातू पाटणा न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे. विशेष म्हणजे या गाण्यात द्विअर्थी शब्दांचा वार करण्यात आला आहे. याच द्विअर्थी शब्दांमुळे गाण्यात अश्लीलता जास्तच वाढलेली आहे, असा आरोप या याचिकेच्या माध्यमातून करण्यात आला आहे. सोबतच अशा प्रकारच्या गाण्यांमुळे लहान मुलं, महिला तसेच समाजातील सर्वच वर्गावर वाईट प्रभाव पडत आहे. भोजपुरी भाषेतील शब्दांचा वापर करून महिलांचे फारच वाईट चित्रीकरण या गाण्यात करण्यात आले आहे. या गाण्यात भोजपुरी भाषा वापरून महिलांबाबत अपशब्द वापरण्यात आले आहेत, असा आरोपही या याचिकेत करण्यात आला आहे.
कठोर कारवाई करण्याची मागणी
भारतीय संविधानातील मूलभूत अधिकारांअतर्गत आपल्या भावना व्यक्त करण्याचा तसेच अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार देण्यात आला आहे. मात्र अभिव्यक्ती स्वातंत्र्यालाही काही बंधनं आहेत. या बंधनांचे उल्लंघन करण्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचे कायद्यात नमूद आहे. याचाच उपयोग करून मेनियाक गाण्यावर तसेच हे गाणे तयार करण्यावर कठोर कारवाई केली जावी, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. या याचिकेवर 7 मार्च सुनावणी होण्याची शक्यता आहे.
गाणे इन्स्टाग्रामवर व्हायरल
दरम्यान, हनी सिंगच्या या गाण्याला चांगलीच प्रसिद्धी मिळाली आहे. इन्स्टाग्रामवर कन्टेंट क्रिएटर्स या गाण्यावर मोठ्या प्रमाणात रिल्स तयार करत आहेत. या गाण्याला आतापर्यंत लक्षावधी व्ह्यूज मिळाले आहेत.
हेही वाचा :