Ragini Khanna : गोविंदाची भाची रागिनीने खरंच धर्म बदलला? ख्रिश्चन धर्म स्वीकारला? खुद्द तिनेच सगळं सांगितलं; म्हणाली...
Ragini Khanna : दिग्गज अभिनेता गोविंदाची भाची रागिनी खन्ना सध्या अनोख्या कारणामुळे चर्चेत आली आहे. या चर्चेवर तिने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.
Continues below advertisement
ACTOR GOVINDA AND RAGINI KHANNA
Continues below advertisement
1/7
अभिनेता गोविंदाची भाची रागिणी खन्ना नेहमीच चर्चेत असते. ती छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. दरम्यान, या अभिनेत्रीने आपला धर्म बदलल्याचा दावा केला जातोय.
2/7
तिने ख्रिश्चन धर्म स्वीकारल्याचं बोललं जात होतं. मात्र या चर्चांवर तिने पहिल्यांदाच महत्त्वाचं भाष्य केलंय. तिने तिच्या धर्मपरिवर्तनच्या चर्चेवरील अफवांना पूर्णविराम दिला आहे.
3/7
रागिनीने नुकतेच 'हिंदी रश'ला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत बोलताना आपल्या धर्मपरिवर्तनाच्या चर्चेवर तिने भाष्य केलं. 'मी प्रत्येक रविवारी चर्चमध्ये जाते. मी माऊँट मेरी चर्चेमध्ये जाते. मी सर्व धर्म मानते. मी माझे धर्मपरिवर्तन केलेले नाही,' असे तिने स्पष्टपणे सांगितले.
4/7
सोबतच माझा जन्म पंजाबमध्ये झालेला आहे. मी अजूनही पंजाबीच आहे. मी जेव्हा लग्न करेन, तेव्हा कदाचित माझा धर्म बदलू शकतो, असंही तिने म्हटलंय. प्रभू येशू यांच्यावर माझी श्रद्धा आहे, असंही तिने म्हटलंय.
5/7
रागिनी खन्नाने आतापर्यंत अनेक मालिकांत काम केलेले आहे. तिचा राधा की बेटियां हा शो चांगलाच गाजला. तिने आतापर्यंत भास्कर भआरती, ससुराल गेंदा फूल यासारख्या मालिकांतही काम केलेलं आहे.
Continues below advertisement
6/7
रागिनी खन्नाने काही चित्रपटांतही काम केलेलं आहे. तीन थे भाई, गुडगांव, पोशम पा यासारख्या चित्रपटात तिने केलेल्या कामाचे खूप कौतुक झाले होते.
7/7
याआधी ती 2021 साली ससुराल गेंदा फूल या शोच्या दुसऱ्या सिझनमध्ये दिसली होती. या शोला मात्र फारचा चांगला प्रतिसाद लाभला नव्हता. चार महिन्यांत ही मालिका बंद पडली. सध्यातरी ती कोणत्याही नव्या मालिकेत काम करत नाहीये. लवकरच ती पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर दिसेल, अशी आशा तिच्या चाहत्यांना आहे.
Published at : 05 Mar 2025 07:58 PM (IST)