Yashraj Mukhate Marriage :  कोरोनाच्या काळात 'रसोड़े में कौन था' या मॅशअपने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. दरम्यान हा मॅशअप लोकांनाही खूप आवडला होता. हा मॅशअप बनवणारा यशराज मुखाटेही (Yashraj Mukhate) त्यानंतर बराच चर्चेत आला. त्याने तयार केलेली ही गाणी अनेकांच्या पसंतीस उतरली. तसेच नुकताच यशराज म्युझिक अल्बमही नुकताच लॉन्च झाला आहे. पण याचसोबत यशराजने एक सुखद धक्का त्याच्या चाहत्यांना दिलाय. यशराज मुखाटे हा नुकताच लग्नबंधनात अडकला आहे. 


यशराज मुखाटेने त्याची गर्लफ्रेंड अल्पना हिच्याशी लग्न केलं आहे. अगदी साध्या पद्धतीने यशराज लग्न झालं. रजिस्टर मॅरेज करत त्याने त्याच्या लग्नाची घोषणा केली. त्याच्या या फोटोवर अनेकांनी कमेंट्स करत त्याच्या नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. यशराजच्या या पोस्टमुळे अनेकांना सुखद धक्का बसला आहे. अभिनेत्री शहनाज गिल हीने देखील यशराजच्या पोस्टवर कमेंट करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. 


यशराजच्या कॅप्शने वेधलं लक्ष


या कॅप्शनमध्ये यशराजने त्याच्या म्युझिक अल्बविषयी देखील म्हटलं आहे. त्याने म्हटलं की, आज दोन महत्त्वाचे कोलॅब झाले, एक माझं अन् अल्पनाचं आणि दुसरं माझ्या अल्बमचं. यशराजच्या या कॅप्शननेही साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. 






यशराजचा पहिला म्युझिक अल्बम


यशराजचा हा पहिलाच म्युझिक अल्बम आहे.  'मन धागा' असे या म्युझिक अल्बमचे नाव असून अमित त्रिवेदी आणि जसलीन रॉयल आणि यशराज मुखाटे यांनी हे गाणे गायले आहे. हे गाणं  अन्विता दत्त यांनी लिहिले असून यशराज मुखाटेने हे गाणं संगीतबद्ध केलं आहे. यशराजच्या ऑफीशअल युट्युब अकाऊंटवर हे गाणं प्रदर्शित करण्यात आले आहे. त्याच्या या गाण्याला देखील बरीच पसंती मिळत असल्याचं पाहायला मिळतंय. 







ही बातमी वाचा : 


Yodha Movie Trailer Launch : विशेष अंदाजात अन् प्रेक्षकांच्या साथीने थेट विमानातच लॉन्च झाला 'योद्धा' चित्रपटाचा ट्रेलर, 15 मार्च रोजी सिनेमागृहात होणार प्रदर्शित