Entertainment News :  YashRaj Film ने दिवाळी सणाचं औचित्य साधात प्रेक्षकाना खास गिफ्ट दिलं आहे. यशराज फिल्मने कारकिर्दीचे 50 वर्ष पूर्ण केली आहे आहेत. हा विशेष आनंदोत्सव साजरा करण्यासाठी 3 मोठ्या मल्टिप्लेक्स चेन पीव्हीआर (PVR) सिनेमा, आयनॉक्स (INOX) आणि सिनेपोलिस (CINEPOLIS) एकत्र येत आहेत. 50 वर्षे पूर्ण झाल्यामुळे यशराजने देशातील बड्या सिनेमा हॉल्सना त्यांचे सदाबहार आणि सुपरहिट सिनेमे विनामूल्य प्ले करण्याची परवानगी दिली आहे. आता चित्रपट गृहांमध्ये पुन्हा जुने चित्रपट रिलीज होणार आहेत. साथीच्या आजारामुळे दिवाळीचा आनंद कमी होऊ नये म्हणून हे चित्रपट दिवाळीनिमित्त प्रदर्शित होत आहेत. हे चित्रपट केवळ 50 रुपयांच्या तिकिटावर पाहता येणार आहेत.


यशराज फिल्म्सने आपल्या सुपरहिट चित्रपटांच्या यादीत ज्या चित्रपटांना दिवाळीला मोफत दाखवण्याची परवानगी दिली आहे त्यामध्ये, सिलसिला, बंटी और बबली, रब ने बना दी जोडी, एक था टायगर, जब तक है जान, बँड बाजा बारात, दम लगा के हैशा, सुलतान, मर्दानी, वीर जारा आणि दिल तो पागल है या चित्रपटांचा समावेश आहे. लोकांना हे चित्रपट पाहण्यासाठी फक्त 50 रुपये द्यावे लागणार आहेत.


थिएटर्स खुली होणं चांगलंच पण नियमावलीचं काय करायचं? व्यावसायिक नाट्य निर्माता संघाचे अध्यक्ष संतोष काणेकर यांचा सवाल


कोरोना महामारीमुळे फिल्म इंडस्ट्रीला यावर्षी मोठा धक्का बसला आहे. चित्रपटगृहे, थिएटर, मल्टिप्लेक्स 7 महिने बंद होते आणि त्यामुळे फिल्म इंडस्ट्रीचे 3500 कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. त्यानंतर 15 ऑक्टोबरपासून थिएटर्स उघडण्याची परवानगी सरकारने दिली आहे, मात्र प्रेक्षक अद्यापही तिथे वळले नाहीत. अशा परिस्थितीत यशराज सुपरहिट चित्रपट दाखवून ओस पडलेल्या चित्रपटगृहात गर्दी फुलवण्याचा प्रयत्न करत आहेत.